Tulsi Vivah 2024 Wishes In Marathi: तुळशी विवाहाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारे देत मंगलमय करा आजचा दिवस!
या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. अशी भावना आहे.
महाराष्ट्रात दिवाळी च्या सणाची सांगता तुलसीविवाह (Tulsi Vivah) संपन्न झाल्यानंतर होते. यंदा 13 नोव्हेंपासून तुलसीविवाह समारंभाला सुरूवात होत आहे. 15 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करून तुलसी विवाह समप्ती होणार आहे. मग या मंगलदिनाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना, परिवाराला देत हा दिवस आनंदमय करण्यासाठी खाली दिलेली मराठमोळी ग्रिटिंग्स, WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages शेअर करून या दिवसाला अधिक खास करू शकाल.
कार्तिक महिना भगवान नारायणांना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. अशी भावना आहे त्यामुळे तुमच्या परिवार, आप्तेष्टांसोबत हा सण अधिक खास करू शकाल. नक्की वाचा: Tulsi Vivah Mangalashtak Lyrics: तुळशीचं लग्न लावताना अचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द .
हिंदू कॅलेंडरप्रमाणे, तुळशी विवाहाचे आयोजन दरवर्षी प्रदोष काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केले जाते. या दिवशी तुळशीमातेचा विवाह विष्णूरूपी शाळीग्रामाशी होतो. तुळशीचं लग्न झाल्यानंतर हिंदू धर्मीयांच्या घरातही लग्नसराईची सुरूवात केली जाते.