Tulsi Vivah 2023 Pot Decoration Ideas: तुळशी विवाहावेळी वृंदावनाची करा खास सजावट; पहा काही सोप्या कल्पना (Watch Video)

त्याच्या भोवती स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर रांगोळी घातली जाते. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात. दिवे लागणीच्या वेळानंतर तुळशीचे लग्न लावले जाते.

Happy Tulsi Vivah (File Image)

Tulsi Vrindavan Decorations: हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्व आहे. असे म्हटले जाते की या महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेनंतर जागे होतात. त्यानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना सुरुवात होते. यासोबतच हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी आणि शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांचा विवाह (Tulsi Vivah 2023) केला जातो. असे मानले जाते की, तुळशीविवाह केल्याने कन्यादान सारखेच फळ मिळते आणि मोक्षाचे दरवाजे उघडतात. तसेच तुळशीजी आणि शाळीग्राम यांच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो.

इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. त्यामुळे तुळशीविवाह 24 नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे. तुळशी विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित केले जाते. त्याच्या भोवती स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर रांगोळी घातली जाते. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात. दिवे लागणीच्या वेळानंतर तुळशीचे लग्न लावले जाते.

या दिवशी तुळशी वृंदावन सजवणे ही एक खास गोष्ट आहे. सजावट प्रक्रियेमध्ये शुभ घटकांची विचारपूर्वक निवड समाविष्ट असते. अनेक लोक वृंदावनावर स्वस्तिक, कमळाची फुले आणि भगवान विष्णूच्या प्रतिमा रेखाटतात. तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत यंदाच्या तुळशी विवाहावेळी तुळशी वृंदावन कसे सजवाल.

Tulsi Vivah 2023 Pot Decoration Ideas- 

दरम्यान, बहुतेक लोक कार्तिक महिन्याच्या द्वादशी तिथीला तुळशीविवाह करतात. यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.06 वाजता संपेल. या दिवशी प्रदोष कालचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.25 ते 6.45 पर्यंत आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावरही लोक तुळशीमातेचा विवाह करू शकतात.

Tags

Devshayani Ekadashi 2023 Importance Pot Decoration Ideas Tulsi Vivah Tulsi Vivah 2023 Tulsi Vivah 2023 Date Tulsi Vivah 2023 Invitation Card Tulsi Vivah 2023 Pot Decoration Ideas Tulsi Vivah auspicious time Tulsi Vivah Ceremony Tulsi Vivah Invitation Card Tulsi Vivah Invitation Card Text Tulsi VIvah Messages Tulsi Vivah Pooja Method Tulsi Vivah SMS Tulsi Vivah WhatsApp Status Tulsi Vivah Wishes Tulsi Vivah Wishes in Marathi Tulsi Vrundavan Decoration When is Tulsi Vivah 2023 तुलसी विवाह तुलसी विवाह 2023 तुलसी विवाह एसएमएस तुलसी विवाह मुहूर्त तुलसी विवाह व्हॉट्स अॅप स्टेटस तुलसी विवाह शुभेच्छा तुलसी विवाह संदेश तुलसीविवाह तुलसीविवाह 2023 आमंत्रण पत्रिका तुलसीविवाह आमंत्रण पत्रिका तुळशी विवाह तुळशी विवाह 2023 तुळशी विवाह 2023 कधी आहे तुळशी विवाह 2023 तारीख तुळशी विवाह पूजा पद्धत तुळशी विवाह मराठी संदेश तुळशी विवाह महत्त्व तुळशी विवाह मेसेज तुळशी विवाह शुभ मुहूर्त तुळशी विवाह शुभेच्छा तुळशी वृंदावन सजावट तुळशी वृंदावन सजावट कल्पना तुळशीचं लग्न तुळशीच्या लग्नाचे निमंत्रण सण आणि उत्सव