Tulsi Vivah 2023 Date and Muhurat: तुळशी विवाह मुहूर्त, तारीख आणि महत्त्व, घ्या जाणून
जाणून घ्या तुलसी विवाह तारीख, मुहूर्त आणि महत्त्व. तुळसी विवाह करणाऱ्या आणि परंपरा मानणारे आणि त्यावर श्रद्धा असलेले काही लोक सांगतात की, तुळसी विवाहाची काही वैशिष्टे आहेत.
When is Tulsi Vivah 2023: भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना अतिशय महत्त्वा आहे. दिवाळी हा या सर्व सण उत्सवात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण. ज्यामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात. साळांनाही सुट्ट्या असतात. सर्वत्र धमाल असते. ही धमाल जवळपास तुलसी विवाहापर्यंत चालते. महाराष्ट्र आणि देशभरात तुळसी विवाह (Tulsi Vivah 2023 Date and Muhura) हा दिवाळीनंतर 15 दिवसांनी येणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. जो साधारण सांयकाळी ते रात्री दरम्यान साजरा केला जातो. खरे तर तुळस ही एक बहूउपयोगी आणि औषधी वनस्पती आहे. जी सर्वसाधारणपणे सर्वांच्या अंगणात वृंदावनावर पाहायला मिळते. अशाच तुळशीची लग्ने घराघरांमध्ये लावली जातात. जाणून घ्या तुलसी विवाह तारीख, मुहूर्त आणि महत्त्व.
तुळशी विवाहाचे महत्त्व
तुळशी विवाहाला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. तुळशी ही पवित्रता, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तसेच ती औषधी आणि आध्यात्मिक गुणधर्म असलेली एक पवित्र वनस्पती म्हणून पूजनीय, दैवी स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करते. विश्वाचे रक्षणकर्ते भगवान विष्णू हे दैवी मर्दानी तत्त्वाचे रूप धारण करतात. त्यांचे मिलन या दोन शक्तींमधील सुसंवादी संतुलन दर्शवते, असे पुराणात सांगितले आहे.
तुलसी विवाह मुहूर्त
यंदाच्या वर्षी 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुलसी विवाह येतो आहे. तुळसी विवाहाचा मुहूर्त सायंकाळी 5.25 पासून सुरु होतो आहे. जो सायंकाळी 7.06 पर्यंत असणार आहे. ज्यांना आपल्या तुलसीचा विवाह करायचा आहे ते लोक या कालावधीत त्याचे आयोजन करु शकतात. अर्थात मुहूर्त पाळला नाही म्हणून आभाळ वगैरे कसळत नाही. मात्र, ज्यांना पंचांग, विधी, मुहूर्त यांनुसार कृती कण्याची हौस असते ते हे मुहूर्त पाळू शकतात.
तुळशी विवाहाची वैशिष्ट्ये
तुळसी विवाह करणाऱ्या आणि परंपरा मानणारे आणि त्यावर श्रद्धा असलेले काही लोक सांगतात की, तुळसी विवाहाची काही वैशिष्टे आहेत. त्यातील काही खालील प्रमाणे-
- वैवाहिक बंध मजबूत होतात. सुसंवादी संबंधांना प्रोत्साहन भेटते.
- जीवनात समृद्धी आणि विपुलता वाढते.
- उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे.
- अडथळे दूर करणे आणि सर्व प्रयत्नांमध्ये यश सुनिश्चित करणे.
- आध्यात्मिक वाढ आणि भक्तीभाव वाढवणे.
अर्थात वर उल्लेख केलेली सर्व वैशिष्ट्ये ही ज्याच्या त्याच्या श्रद्धा आणि मानण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ही वैशिष्ट्ये, श्रद्धा यांवर मतभिन्यता असू शकते. मात्र, धार्मिक समारंभाच्या पलीकडे, तुळशी विवाह हा दैवी मिलनाचा उत्सव मानला जातो. आपल्या जीवनात पवित्रता, भक्ती आणि समृद्धी वाढवण्याच्या उद्देशाने भक्त तुळशी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद घेण्यासाठी या पवित्र विधीत सहभागी होतात, अशी मान्यता आहे.