Tulsi Vivah 2021 Rangoli Designs: तुळशी विवाहाचा सण खास बनवण्यासाठी 'या' सोप्प्या सुंदर, आकर्षक पद्धतीच्या रांगोळ्या दारासमोर काढा (Watch Video)
त्यामुळे तुळशी विवाहासारख्या पवित्र आणि शुभ दिवशी ही दारासमोर , तुळशी पाशी रांगोळी काढली जाते.
हिंदू धर्मात तुळशी विवाहाला (Tulsi Vivah 2021) विशेष महत्त्व आहे. याला देव उठनी एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, तुळशी विवाहाचा पवित्र सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. यावर्षी तुळशी विवाह १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सोमवार या दिवशी आहे. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनंतर योगनिद्रातून जागे होतात.शास्त्रानुसार चातुमासात शुभ आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. (Tulsi Vivah 2021 Date and Muhurat: तुळशी विवाह साठी पहा यंदाच्या तारखा, विवाह मुहूर्त काय? ) आपल्याकडे शुभ प्रसंगी दारासमोर, अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुळशी विवाहासारख्या पवित्र आणि शुभ दिवशी ही दारासमोर , तुळशी पाशी रांगोळी काढली जाते. या खास दिवशी तुम्ही ही रांगोळी काढण्याचा विचार केला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास तुळसी विवाह रांगोळी डिझाइन.
तुलसी विवाह रांगोळी
तुलसी विवाह सोपी रांगोळी
तुलसी विवाह स्पेशल रांगोळी
देव उठनी एकादशीपासून मांगलिक कार्याला सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार या दिवशी शालिग्राम अवतारातील भगवान विष्णूचा माता तुळशीशी विवाह झाला होता.