Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ

कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला सुरुवात होते. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे.

Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ
तुळस - शाळीग्राम विवाह Photo credit : twitter

Tulsi Vivah 2019: कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. या दिवशी भगवान विष्णूचा विवाह तुळशी मातेशी लावला जातो. ही पुजा केल्यान धनलाभ होतो, असे मानले जाते. परंतु, त्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. तुम्हालाही असा धनलाभ हवा असेल तर खालील गोष्टी करून तुम्ही भरपूर श्रीमंत होऊ शकता. चला तर मग धनलाभ होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहेत, ते जाणून घेऊयात..(हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका)

या 5 गोष्टी करा आणि भरपूर धनलाभ मिळवा –

  • तुम्हाला एखाद्या कार्यात वारंवार अडथळा येत असेल, तर विष्णू मंदिरात जावून एक नारळ आणि थोडे बदाम अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व कामे सुरळीत होतील.
  • प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूची पुजा करा.
  • तसेच विष्णूची पुजा करताना आपल्या जवळील काही पैसे विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवा. पुजा झाल्यानंतर ते पैसे आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता असते.
  • दुधामध्ये केसर मिसळून विष्णूला अभिषेक करा. त्यामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
  • एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान केल्यास तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदेल. तसेच स्नान झाल्यानंतर गायत्री मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

तुळशी विवाहावेळी तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते. तसेच तुळशीभोवती ऊस,  झेंडूची फुले,  आवळा, चिंच आदींची मांडणी केली जाते. तसेच तुळशी रुंदावणासमोर आकर्षक रांगोळीही काढली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. असं म्हटलं जातं की, तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2019 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).