Tukaram Beej 2022 Images: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस
तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदा 20 मार्च रोजी तुकाराम बीज साजरी होणार आहे. या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहु गावात झाला. पंढरपूरचे विठ्ठू माऊली हे हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात.
जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला खालील ईमेज उपयोगात येतील. (हे देखील वाचा: Google Doodle Nowruz 2022: पारसी नववर्ष नवरोज निमित्त गूगल डूडल बनवत सर्च इंजिनकडून हटके शुभेच्छा)
Tukaram Beej 2022 HD Images (Photo Credit- File Image)
तुकाराम महाराज हे वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत म्हणून ओळखले जातात. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2022 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

