Tripurari Pournima 2023 Wishes In Marathi: त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा शेअर करत साजरी करा कार्तिकी पौर्णिमा
तसेच त्रिपुरारी पौर्णिमा हा तुलसी विवाह समारंभातील शेवटचा दिवस असतो. या निमित्ताने तुळशीची लग्नं देखील पार पडतात.
कार्तिकी पौर्णिमेचा (Kartiki Pournima) दिवस हा हिंदू धर्मिय त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Pournima) म्हणून साजरा करतात. त्रिपुरारी पौर्णिमा ही देव दिवाळी (Dev Diwali) म्हणून देखील साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा दोन दिवसामध्ये विभागून आली असल्याने अनेकांना त्यांच्या सेलिब्रेशन बाबत गोंधळ असू शकतो. त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी देव पृथ्वीतलावर येतात अशी धारणा आहे. मग अशा या मंगलपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना देऊन त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस त्यांच्याही आयुष्यात खास करू शकता. त्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही खास ग्रिटिंग्स तुम्ही Facebook Messages, WhatsApp Messages, Status, Greetings, Quotes द्वारा शेअर करू शकाल.
कार्तिकी पौर्णिमा यंदा अनेक ठिकाणी 26 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या कार्तिकी पौर्णिमेला सर्वत्र दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्याची पद्धत आहे. देवांचे पृथ्वीतलावर आगमन होत असल्याने त्यांच्यासाठी दीपदान केले जाते अशी भावना यामागे आहे. मग असा हा सण तुम्ही डिजिटल ग्रिटिंग़्स तुमच्या खास व्यक्तींना पाठवून साजरा करू शकता. Dev Deepawali 2023 Date: देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व .
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा
सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली,
शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होवो,
तुमच्यावर सुख, संपत्ती, आरोग्याच्या वर्षाव होवो,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण तिमिरातून तेजाकडे नेणारा,
सण प्रकाशाची वाट दाखवणारा,
सण नवी उमेद जागवणारा,
सण नात्यांचे रेशीम बंध घट्ट करणारा,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ नमो भगवते वासुदेवाय!
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
त्रिपुरारी पौर्णिमेचा आजचा दिवस
तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी
घेऊन येणारा असो हीच कामना
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
घाट परिसर, मंदिरं या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी खास सजावट करण्याची पद्धत आहे. तसेच त्रिपुरारी पौर्णिमा हा तुलसी विवाह समारंभातील शेवटचा दिवस असतो. या निमित्ताने तुळशीची लग्नं देखील पार पडतात.