Tiranga Flag as DP For Independence Day 2024: 78 व्या स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रध्वज Facebook, WhatsApp, Instagram वर डीपी ठेवण्यासाठी खास फोटोज!

भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानीने बनवला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते.

Tiranga | Pixabay.com

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन (78th Independence Day) 15 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. ब्रिटीशांच्या गुलामगिरीमधून बाहेर पडून भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला देशासाठी प्राण वेचलेल्या आणि स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावलेल्यांचं स्मरण ठेवत त्यांच्याप्रति आदरांजली अर्पण केली जाते. भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट दिवशी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात. संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक परेड आणि विविध कार्यक्रमांसह साजरा केला जातो. डिजिटल मिडीया मध्येही या स्वातंत्र दिना निमित्त तुम्ही तिरंगा डीपी म्हणून ठेवत त्याचं वेगळ्या अंदाजात सेलिब्रेशन करू शकता. मग यासाठी खालील दिलेला तिरंगा फोटो तुम्ही डाऊनलोड करून तो डीपी म्हणून सेट करू शकता.

भारतीय तिरंगा फोटोज

Indian national flag (File and Representative Image)
Tiranga | Pixabay.com
Tiranga | Pixabay.com
Tiranga | Pixabay.com

WhatsApp Profile फोटो कसा बदलायचा?

  • व्हॉट्सअ‍ॅप वर फोटो बदलण्यासाठी तुमच्या डिव्हाईस वर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • नंतर आयाफोन युजर्स Setting च्या पर्यायावर जाऊन तर अ‍ॅन्ड्रॉईद युजर्स 3 डॉटेड आयकॉनवर वर क्लिक करून डीपी बदलू शकता.
  • यानंतर तुमचा डीपी दिसेल त्याला क्लिक करा.
  • Edit वर क्लिक करून Choose Photo चा पर्याय निवडा आणि तेथे तिरंग्याचा फोटो सेट करा.

फेसबूक प्रोफाईल फोटो कसा बदलाल?

  • फेसबूक वरही डीपी बदलण्यासाठी त्याचं अ‍ॅप ओपन कारा.
  • तुमच्या फोटोवर क्लिक करा.
  • सिलेक्ट प्रोफाईल फोटो वर क्लिक करून तिरंग्याचा फोटो अपलोड करा. नंतर तो सेव्ह करा.

इंस्टाग्राम वर डीपी फोटो कसा बदलाल?

  • इंस्टाग्राम ओपन करून तुमच्या युजरनेमच्या बाजूला असलेल्या 'Edit Profile' चा पर्याय निवडा.
  • सेटिंग अ‍ॅन्ड प्रायव्हसी सिलेक्ट करा. अकाऊंट सेंटर निवडा तुमचं प्रोफाईल निवडा.
  • त्यानंतर प्रोफाईल पिक्चर मध्ये जाऊन तेथे डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करा.

X वर कसा बदलाल डीपी फोटो ?

  • X वर फोटो बदलण्यासाठी देखील तुमच्या डीपी वर क्लिक करा.
  • नंतर प्रोफाईल सिलेक्ट करा. एडीट प्रोफाईल चा पर्याय निवडा.
  • आता डीपी बदलण्यासाठी तेथे क्लिक करून तिरंगा निवडा.
  • तुमचा नवा डीपी सेव्ह करा.

नक्की वाचा: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!

दरम्यान सण साजरा करताना  चुकूनही झेंड्याचा अवमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानीने बनवला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now