Tilkund Chaturthi January 2023 Date: यंदाच्या तिलकुंद चतुर्थीला विशेष महत्व; जाणून घ्या तारीख, व्रताचे नियम आणि पूजाविधी

या दिवशी गणेशाची भक्तीभावाने पूजा केल्यास भाविकाच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पुर्ण होतात अशी आख्यायिका आहे.

Ganpati idol (Photo Credits: Pixabay)

दरवर्षी मकर संक्रांती नंतर येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणेशाची भक्तीभावाने पूजा केल्यास भाविकाच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पुर्ण होतात अशी आख्यायिका आहे. तरी यावर्षी २४ जानेवारीला तिलकुंद चतुर्थी आहे. तुम्ही देखील तिलकुंद चतुर्थीचं अनोखं व्रत करण्याचा विचार करत असल्यास या व्रताची तारीख, नियम आणि खास पुजाविधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे व्रत केल्यास गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. मंगळवारी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंद चतुर्थी आहे. भगवान गणेश ही विद्येची दैवत आहे. शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या सुख समृध्दीसाठी गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते. तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास अडथळे दूर होतात. श्री गणेशाला यादिवशी पांढरे तिळ वाहल्याने तसेच तिळापासून बनलेला प्रसाद अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

 

तिलकुंद चतुर्थी पूजाविधी:-

तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी प्रातकाळी स्नान करुन पूजा करावी. पुजे दरम्यान धुप दिप लावावा. श्रीगणेशास फळ, फुल, पंचामृत, तिर्थप्रसाद आणि तिळापासून बनलेले लाडू किंवा तिळाच्या वडीचा प्रसाद द्यावा. तसेच गणेशाची पूजा करताना तुमचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेने असावे. पूजा सुरु करण्यापूर्वी गणपती स्तोत्राचा जाप करावा. तसेच पूजा समाप्ती नंतर श्री गणेशाय नम चा १०८ वेळा जप करावा. तसेच यापूजेनंतर गरुजूंना दान केल्यास विशेष प्रभावी ठरतं. (हे ही वाचा:- Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipes: माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बानवाल?)

 

भगवान गणेश  सर्व प्रकारचे संकट दूर करणारे आणि कामातील अडथळे दूर करणारं दैवत आहे. म्हणून लाडक्या गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. भगवान गणेश हा सुखकर्ता आहे. म्हणूनच तिलकुंद चतुर्थीचं हे व्रत केल्याने सगळे विघ्न दूर होवून आयुष्यात सुख समृध्दी नांदते. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी उपवास करायचा सतो. या दिवशी तीळ, फळे किंवा कंद खावूनचं उपासना करावी. उपवासात गणपतीची पूजा केल्यानंतर चंद्र पाहावा आणि मगच उपवास सोडावा. या व्रताबद्दल शास्त्रात लिहिले आहे की या दिवशी गणेशजींची पूजा करून व्रत केल्यास सर्व प्रकारचे संकट दूर होतात.