Dussehra 2022 : यंदाचा दसरा आणखी खास, तीन शुभ योग आले जुळून, जाणून घ्या, शुभ मुहूर्त
5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दशमी तिथी संपेल, चला तर मग जाणून घेऊया, शुभ मुहूर्त
Dussehra 2022 : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणार दसरा आज 5 ऑक्टोबरला आहे. दसरा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमी या तिथीला साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, अश्विन शुक्ल दशमीला भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. पौराणिक कथेनुसार, दुर्गादेवीने अश्विन शुक्ल दशमीला महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजय होतो.त्यामुळे दसरा साजरा केला जातो. पंचांगानुसार 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी दशमी तिथी सुरू होईल. 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दशमी तिथी संपेल, चला तर मग जाणून घेऊया, शुभ मुहूर्त [हे देखील वाचा: Dussehra 2022 Special Ukhane: दसरा सणाच्या निमित्ताने कुटुंबियांचा हट्ट पुरवण्यासाठी सुवासिनी घेऊ शकतात 'हे' खास उखाणे, वाचा]
दसऱ्याचा विजय मुहूर्त
5 ऑक्टोबरला दुपारी 2:07 पासून ते 2:54 पर्यंत असेल
शुभ मुहूर्त
5 ऑक्टोबरला दुपारी 01 :20 पासून ते 03 :41 मिनिटांपर्यंत
दसऱ्याला तीन महत्त्वाचे शुभ योग
ज्योतिषशास्त्राच्या गणनेप्रमाणे यावर्षी दसऱ्याला सुकर्मा, धृती आणि रवी योग जुळून येत आहेत. त्यामुळे या वर्षीचा दसरा खास आहे.
योग मुहूर्त
रवी योग : 5 ऑक्टोबरला सकाळी 06:21 ते रात्री 09:18 मिनिटांपर्यंत
सुकर्मा योग :4 ऑक्टोबरला सकाळी 11:23 पासून ते 5 ऑक्टोबरला सकाळी 08:21 मिनिटांपर्यंत
धृती योग : 5 ऑक्टोबरला सकाळी 08: 21 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 05: 19 मिनिटांपर्यंत
राहू काळ
दसऱ्याच्या दिवशी राहू काल दुपारी १२.०० ते दुपारी १.३० पर्यंत आहे. या काळात दसऱ्याची पूजा करू नये. खास योग जुळून येत असल्यामुळे नवीन वस्तू, शुभ कार्य, नवीन कार्य तुम्ही दसऱ्यापासून प्रारंभ करू शकता.