Shardiya Navratri 2024: यंदा 'या' वाहनावर स्वार होऊन येत आहे देवी दुर्गा; नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका
कारण, नवरात्री उत्सवात माता दुर्गाची पूजा करताना या चुका तुम्हाला महागात पडू शकता. त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी करू नका, ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2024) ला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी माता दुर्गा विशिष्ट वाहनावर बसून पृथ्वीवर स्वार होत असते. यंदा माता दुर्गा पालखीत स्वार होऊन येणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवी (Durga Mata) च्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक आपल्या घरी घटस्थापना (Ghatasthapana 2024) किंवा कलशाची स्थापना करतात. तसेत अनेकजण नवरात्रीत नऊ दिवस उपवास करतात.
शारदीय नवरात्रीमध्ये मातेची यथायोग्य पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि समृद्धी नांदते. नवरात्रीमध्ये पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, नवरात्री उत्सवात माता दुर्गाची पूजा करताना या चुका तुम्हाला महागात पडू शकता. त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी करू नका, ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. चला तर मग नवरात्री उत्सवादरम्यान, कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊयात...(हेही वाचा - Shardiya Navratri 2024 Ghatasthapana Muhurat: घटस्थापना कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)
नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका -
- शारदीय नवरात्रीत अखंड दिवा लावत असाल तर हा दिवा नऊ दिवस विझू नये.
- नवरात्रीत नऊ दिवस घरातील सात्विक अन्न खावे. तामसिक अन्न म्हणजे लसूण आणि कांदा खाऊ नये.
- शारदीय नवरात्रीमध्ये घर आणि मंदिराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
- जर तुम्ही घरात अखंड दिवा पेटवत असाल तर घर कधीही रिकामे ठेवू नये.
- नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नयेत.
- शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसात दाढी, मिशा आणि केस कापू नयेत.
- या दिवसात मांस, मद्य, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये.
- या काळात कोणाबद्दल चुकीचे विचार मनात आणू नयेत आणि घरात भांडणही करू नये.
Disclaimer: हा लेख लोकश्रद्धेवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी आणि पूर्णतेसाठी लेटेस्टली मराठी जबाबदार नाही.