Sawan 2024 Festivals Full Calendar: श्रावण महिन्यात साजरे होणार 'हे' सण; जाणून घ्या जन्माष्टमी, रक्षाबंधनसह इतर महत्त्वाच्या सणांच्या तारखा
श्रावण महिना भगवान शिवाला विशेष प्रिय आहे, म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातून पाणी भरले जाते आणि भगवान शंकराच्या रूपातील ज्योतिर्लिंगाला अर्पण केले जाते. याला कावड यात्रा असेही म्हणतात. या महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक देखील केला जातो.
Sawan 2024 Festivals Full Calendar: दरवर्षी श्रावन महिना (Shravan Month) मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. हा शुभ महिना भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात अनेक धार्मिक कार्ये केली जातात. आषाढ पौर्णिमेनंतर लगेच श्रावण महिन्याला (Shravan Month 2024) सुरुवात होते. हिंदू धर्मातील लोकांसाठी श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना हा सर्वोच्च साधनेचा पर्व आहे.
श्रावण महिना भगवान शिवाला विशेष प्रिय आहे, म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातून पाणी भरले जाते आणि भगवान शंकराच्या रूपातील ज्योतिर्लिंगाला अर्पण केले जाते. याला कावड यात्रा असेही म्हणतात. या महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक देखील केला जातो. श्रावण महिन्यात बहुतांश शिवभक्त सोमवारी उपवास करतात. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. (हेही वाचा - Gatari Amavasya 2024 Date in Maharashtra: गटारी अमावस्याची तारीख, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या)
श्रावन 2024 मध्ये येणाऱ्या सणांचे संपूर्ण कॅलेंडर - (Sawan 2024 Festivals Full Calendar)
- श्रावन शिवरात्री: शिवरात्री श्रावन महिन्याच्या 14 व्या दिवशी साजरी केली जाईल. यंदा सावन शिवरात्री 2 ऑगस्टला आहे.
- नाग पंचमी : यंदा नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
- हरियाली तीज : हरियाली तीज यंदा 7 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.
- रक्षाबंधन : यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे.
- कजरी तीज: कजरी तीज 22 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.
- जन्माष्टमी: यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.
श्रावण महिन्यातील सोमवाराच्या तारखा -
- पहिला श्रावन सोमवार: 22 जुलै
- दुसरा श्रावन सोमवार: 29 जुलै
- तिसरा श्रावन सोमवार: 5 ऑगस्ट
- चौथा श्रावन सोमवार: 12 ऑगस्ट
- पाचवा श्रावन सोमवार: 19 ऑगस्ट
पंचांग नुसार, यावर्षी श्रावन महिना 22 जुलैपासून सुरू होईल आणि 19 ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा श्रावन महिना 29 दिवस साजरा केला जाणार आहे. भगवान शिवाचे भक्त श्रावन सोमवारचे व्रत अत्यंत शुभ मानतात.