Diwali 2023 Office Bay Decoration Ideas: यंदा दिवाळीनिमित्त बाटलीतील दिव्यापासून तोरणपर्यंत 'अशा' प्रकारे करा ऑफिस डेकोरेशन (View Pics)
तुम्हालाही दिवाळीनिमित्त तुमच्या ऑफिसची सजावट करायची आहे का? आम्ही तुमच्यासाठी ऑफिस बे डेकोरेशनच्या काही भन्नाट कल्पना घेऊन आलो आहोत. तुम्ही या कल्पना वापरून तुमचं ऑफिस अगदी लख्ख करू शकता.
Diwali 2023 Office Bay Decoration Ideas: भारत तसेच इतर अनेक देशात दिवाळीचा सण (Diwali 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात रोमांचक सण आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे ज्यामध्ये भरपूर विधी असतात. या सणाला सर्व घरे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जातात. यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. या सणानिमित्त लोक घरोघरी पार्ट्या तसेच ऑफिस पार्टीचे आयोजन करतात. प्रत्येकजण भेटवस्तूंची देवाणघेवाण करून आणि आपल्या प्रियजनांना मिठाई आणि शुभेच्छा पाठवून हा भव्य उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. दिवाळीनिमित्त लोक घराच्या सजावटीसह ऑफिसमध्ये देखील खास सजावट करतात आणि दिव्यांचा सण उत्साहात साजरा करतात. तुम्हालाही दिवाळीनिमित्त तुमच्या ऑफिसची सजावट करायची आहे का? आम्ही तुमच्यासाठी ऑफिस बे डेकोरेशनच्या काही भन्नाट कल्पना (Office Bay Decoration Ideas) घेऊन आलो आहोत. तुम्ही या कल्पना वापरून तुमचं ऑफिस अगदी लख्ख करू शकता.
कागदी कंदील -
दिवाळीत कागदी कंदीलाची सजावट महत्त्वाची असते. कागदी कंदील हे अनेक रंगात येतात. तुम्ही ऑफिसच्या सजावटीत कागदी कंदील लावल्यात ते अधिक आकर्षक दिसेल.
बाटलीमध्ये दिवे -
दिव्यांशिवाय दिवाळीचा सण अपूरा आहे. तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये दिवे लावून खास सजावट करू शकता. यामुळे तुमच्या ऑफिस एरियाचा लूक खूपचं खास दिसेल. तुम्ही या बॉटल डेस्कवर ठेवू शकता.
दिवाळी तोरण -
दिवाळीचा सण साजरा करताना तोरणाला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंपासून तोरण बनवून ते ऑफिसच्या दरवाजात लावू शकता. यामुळे ऑफिसची शोभा वाढण्यास मदत होईल. तुम्ही फुले, पाने, मणी, धागे आणि इतर अनेक वस्तूंपासून तोरण बनवू शकता.
रांगोळी -
रांगोळीशिवाय कोणताही सणाचा प्रसंग अपूर्ण असतो आणि दिवाळी साजरी करताना कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला सजवणाऱ्या काही सुंदर रांगोळ्यांचे नमुने निश्चितपणे आवश्यक असतात. तुम्ही रंगीत रांगोळीपासून खास रांगोळी काढू शकता. यात सुंदर फुलांच्या पाकळ्याचा वापर केल्यास तुमची रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.
दिवे किंवा पणत्या -
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तुम्ही ऑफिसच्या सजावटीसाठी दिव्यांचा वापर करू शकता. यामुळे तुमचं डेकोरेशन अधिक आकर्षक दिसेल.
सुंदर फुले -
तुम्ही तुमचे वर्कस्टेशन सुंदर फुलांनी सजवू शकता. याशिवाय तुम्ही ताज्या फुलांसह फुलदाणी देखील डेस्कवर ठेवू शकता. यामुळे ऑफिसचं वातावरण सुंगधी आणि अधिक प्रसन्न होईल.
दिवाळीचा सण आता फक्त घरांपुरता मर्यादित राहिलेले नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तेथे देखील तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही हा सण अधिक आनंदाने साजरा करू शकता. योग्य सणाचा आनंद घेण्यासाठी डेस्क आणि ऑफिस इंटीरियर सजवण्यासाठी दिवाळी हा एक उत्तम सण आहे. या दिवाळीत तुमच्या ऑफिसचे खऱ्या अर्थाने कायापालट करण्यासाठी तुम्ही ऑफिस बे डेकोरेशनच्या कल्पनांचा नक्की उपयोग करू शकता.