Mehndi Designs For Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनासाठी हातावर काढा 'या' साध्या, सोप्या आणि काही मिनिटांमध्ये हटके लूक देणाऱ्या मेहंदी डिझाईन्स, पहा व्हिडिओ
तुम्ही खालील व्हिडिओ पाहून अगदी सोप्या आणि कमी वेळेत तयार होणाऱ्या मेंहदी डिझाईन्स काढून आपल्या हाताची शोभा वाढवू शकता.
Mehndi Designs For Raksha Bandhan 2024: भारतात प्रत्येक सणाच्या निमित्ताने तळहातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला आपल्या हातावर मेहंदी (Mehndi) काढतात. हातावर मेंहदी लावणे खूप शुभ मानले जाते. हातावर मेंहदी काढण्यासाठी तुम्हाला अनेक डिझाइन्स (Mehndi Designs) उपलब्ध आहेत. उद्या देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2024) सण साजरा होणार आहे. या सणासाठी तुम्ही तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी खास मेंहदी डिझाईन्स काढू शकता. (हेही वाचा - Raksha Bandhan Special Marathi Songs: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यावरील खास मराठी गाणी ऐकून साजरा करा रक्षाबंधनाचा सण! (Watch Video))
रक्षाबंधनासाठी तुम्ही फुलांची डिझाईन असलेली मेंहदी काढू शकता. याशिवाय, तुम्ही पूर्ण हातावर मेहंदी आणि वेल काढू शकता. बहुतेकदा तळहातांवर फुलांसह कळ्या असलेली डिझाईन्स काढण्सास प्राधान्य दिले जाते. तथापी, तुम्ही राखीच्या आकाराची खास पाने, फुले असलेली डिझाईन्सही काढू शकता. आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनासाठी काढायच्या खास मेंहदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून अगदी सोप्या आणि कमी वेळेत तयार होणाऱ्या मेंहदी डिझाईन्स काढून आपल्या हाताची शोभा वाढवू शकता. (हेही वाचा - Raksha Bandhan 2024 Mehndi Designs: रक्षाबंधनासाठी काढा 'या' सुंदर, ट्रेंडी मेहंदी डिझाइन; पहा व्हिडिओ)
रक्षाबंधनासाठी खास मेंहदी डिझाईन्स -
तुम्हाला अगदी कमी वेळेत मेंहदी काढायची असेल तर तुम्ही तळहातावर गोल टिक्की बनवून काही मिनिटात मेहंदी काढू शकता. या पद्धतीने मेंहदी काढल्यानंतर तुम्ही तळहाताचे बोटांच्या वरच्या भागावरही मेहंदी लावू शकता. ही मेंहदी तुमच्या हाताला अधिक हटके लूक देते.