Subhash Chandra Bose Jayanti 2024 Quotes: सुभाष चंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार घ्या जाणून

त्यांचे कार्य, विचार आणि लढा आजही तमाम तरुणांना प्रेरणा देतो. 23 जानेवारी हा नेताजींचा जन्म दिवस. या दिवशी देशभरात आणि जगभरातील तमान नेताजीप्रेमी सुभाष चंद्र बोस जयंती (Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary) साजरी करतात.

Subhash Chandra Bose Jayanti 2024

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes in Marathi: नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांचे कार्य, विचार आणि लढा आजही तमाम तरुणांना प्रेरणा देतो. 23 जानेवारी हा नेताजींचा जन्म दिवस. या दिवशी देशभरात आणि जगभरातील तमान नेताजीप्रेमी सुभाष चंद्र बोस जयंती (Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary) साजरी करतात. आजच्या डिजिटल मीडियाच्या युगात लोक जयंतीनिमित्त फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) व्हॉट्सअॅ (WhatsApp ) आदींवरुन मेसेज (Messages), इमेज (Images) शेअर करत परस्परांना शुभेच्छा देतात. त्यांच्या विचारांचा प्रचार करतात. आपणही या उत्साहात सहभागी होऊ इच्छित असाल तर त्यासाठी नेताजींचे विचार येथे देत आहोत. जाणून घ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार.

प्रारंभिक जीवन :

ब्रिटीश राजवटीतील तत्कालीन ओरिसा राज्यातील कटक येथे संपन्न कुटुंबात जन्मलेले सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 1897 मध्ये झाला. जानकीनाथ बोस आणि आई प्रभावती देवी यांचे नववे अपत्य असलले सुभाष चंद्र हे भविष्यात इतके मोठे कार्य करतील याची कोणी कल्पनाही केली नसेल. नेताजी मोठे देशभक्त होते. त्यांचे प्रारंभिक जीवन राष्ट्रवादी प्रकटीकरणांच्या घटनांनी भारलेले होते. (हेही वाचा, Republic Day Of India 2024: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी WhatsApp, Facebook, Twitter, Instagram Account वर तिरंगा Profile Picture म्हणून कसा ठेवाल?)

सुभाषचंद्र बोस यांचे विचार

अन्याय सहन करणे आणि अन्यायासोबत भागिदारी करणे, हा सर्वात मोठा गुन्हा आहे- सुभाष चंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

संघर्षांने मला माणूस बनवले. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. जो माझ्यात कधीही नव्हता- सुभाष चंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

उच्च विचारांमुळे मनाची कमजोरी दूर होते. त्यामुळे आपण नेहमीच उच्च विचार करत आणि अंमलात आणत राहिले पाहिजे- सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

जीवनात संघर्ष राहिला नाही आणि आपणास सतत कोणत्या तरी भीताचा सामना करावा लागत असेल तर, जीवनाचा अर्थच समाप्त होतो- सुभाष चंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

स्वत:च्या शक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास बाळगा. इतरांची ताकत तुम्हाला दुबळे बनवते- सुभाष चंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

कोणापुढेही झुकू नका. पण कार्यच असे करा जर कधी झुकण्याची वेळ आलीच तर वीरासारखे झुका- सुभाष चंद्र बोस

Subhash Chandra Bose Jayanti 2024

 

राजकीय कारकीर्द आणि आदर्श:

बोस यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगाल राज्य काँग्रेसचे सचिव म्हणून काम केले. 1938 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी "पूर्ण स्वराज" किंवा ब्रिटीश राजवटीपासून संपूर्ण स्वराज्याचा पुरस्कार केला. त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत संपूर्ण स्वशासनाच्या आदर्शांचा पुरस्कार केला. (हेही वाचा, Tiranga DP Images, HD Wallpapers for Free Download Online: सोशल मीडीयामध्ये प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' ठेवण्यासाठी डाऊनलोड करा 'भारतीय राष्ट्रध्वज' फोटो! )

सुभाषचंद्र बोस जयंती उत्सव:

संपूर्ण भारतामध्ये, सुभाष चंद्र बोस जयंती त्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून, भारतीय राष्ट्रध्वज फडकावून आणि शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरी केली जाते. नेताजींच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि ओरिसा या दिवशी सार्वजनिक सुट्टी पाळतात. बोस यांच्या जीवनाशी निगडित अद्वितीय ठिकाणे उत्सवाचे केंद्रबिंदू बनतात, देशभरातील लोकांना आकर्षित करतात.