Spring Equinox 2019: Google ने Doodle साकारत केले वसंत ऋतूचे स्वागत
गुगलचे हे अॅनिमेडेट डुडल रंगीबेरंगी असून त्यात हिरवा, निळा आणि गुलाबी रंग प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त गुगलने खास डुडल साकारले आहे. गुगलचे हे अॅनिमेडेट डुडल रंगीबेरंगी असून त्यात हिरवा, निळा आणि गुलाबी रंग प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. वसंत ऋतूत निसर्गात होणारी रंगांची उधळण डुडलमधून दाखवण्यात आली आहे. आज संपूर्ण जगात वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्साह आहे तर भारतात होळीचा उत्सव पाहायला मिळणार आहे.
आजपासून पाश्चिमात्य देशात वसंत ऋतूचे आगमन झाले असून आज रात्रीपासून चंद्र इतर दिवसांपेक्षा थोडा मोठा दिसेल. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त गुगलने अगदी समर्पक डुडल साकारले आहे. पृथ्वी दाखवण्यात आली असून त्यावर एक फुल उमलले दिसत आहे. तसंच विविध झाडे उमलत असल्याचे दिसत आहे. हेच वसंत ऋतूचे प्रतीक आहे. या डुडलवर क्लिक केल्यावर Spring Equinox 2019 असे लिहिलेले दिसते. म्हणजे आज 'विषुवदिन' असून वसंत ऋतूचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर आजच्या या खास दिवशी दिवस आणि रात्र समान असेल. कारण आज सूर्य विषुववृत्तातून जाईल.
तर भारतात आज (20 मार्च, बुधवार) होळी पौर्णिमा असल्याने रात्री होलिका दहन होईल तर उद्या (21 मार्च, गुरुवार) धुळवडीला रंगांची उधळण केली जाईल. हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?
वर्षातील तिसऱ्या सुपरमूनचे आज दर्शन:
आज होळी पौर्णिमा आणि वसंत ऋतूचे आगमन यामुळे आजचा दिवस खास आहे. त्याचबरोबर आज रात्री वर्षातील तिसऱ्या सुपरमूनचे दर्शन होणार आहे. वसंत ऋतूच्या आगमनादिवशी दिसणारा हा पहिला सुपरमून असणार आहे. हा योग 20 वर्षानंतर आला आहे. होळी पौर्णिमा, विषुवदिन आणि Supermoon असा तिहेरी योग, यंदा वर्षातलं शेवटच सुपरमून दर्शन पहा किती वाजता
गुगल नेहमीच खास दिवशी डुडल साकारत तो दिवस साजरा करतो. तसंच दिग्गजांच्या जयंती, स्मृतीदिनानिमित्त डुडल साकारत त्यांना मानवंदना दिली जाते.