Slap Day 2020: 'व्हॅलेनटाईन डे' नंतर Anti-Valentine Day ला सुरुवात, का साजरा करतात स्लॅप डे?
हा वीक सुद्धा सात दिवसांचा असून त्यामध्ये ही विविध डे साजरे केले जात असून त्यापैकी पहिला दिवस म्हणजे 'स्लॅप डे' (Slap Day).
जगभरात 'व्हॅलेनटाईन डे' (Valentine Day) साजरा करण्यापूर्वी 'व्हॅलेनटाईन वीक' (Valentine Week) ला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होते. तर 7 फेब्रुवारी पासून ते 14 तारखेपर्यंत प्रेमवीर एकमेकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येतात. तर व्हॅनेटाईन डे दिवशी प्रेमवीरांमध्ये या दिवसाचा आनंद, उत्साह पाहण्यासारखाच असतो. परंतु 14 फेब्रुवारी नंतर येणाऱ्या 15 तारखेला अॅन्टी व्हॅलेनटाईन वीक (Anti Valentine Week) ला सुरुवात होते. हा वीक सुद्धा सात दिवसांचा असून त्यामध्ये ही विविध डे साजरे केले जात असून त्यापैकी पहिला दिवस म्हणजे 'स्लॅप डे' (Slap Day). या दिवशी जर तुम्हाला एखाद्यावर राग व्यक्त करायचा असेल तर या दिवसाची संधी तुम्हाला मिळणार आहे.
स्लॅप डे निमित्त तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टीची आठवण करुन देत हा दिवस साजरा करु शकता. तसेच स्लॅप देण्याला कानाखाली मारणे असे ही म्हणतात. व्हॅलेनटाईन डे नंतर तुम्हाला एखाद्याने त्रास, दुखावले असेल तर त्याच्या विरोधात उभे राहत तुम्ही त्या व्यक्तीला स्लॅप डे चा दिवस फुकट जाऊ देऊ नका. तर स्लॅप डे (15 फेब्रुवारी), किक डे (16 फेब्रुवारी), परफ्युम डे (17 फेब्रुवारी), फ्लर्टिंग डे (18 फेब्रुवारी), कन्फेशन डे (19 फेब्रुवारी), मिसिंग डे (20 फेब्रुवारी) आणि ब्रेकअप डे (21 फेब्रुवारी) साजरा करण्यात येतो. Anti-Valentine Week 2020 Calendar: स्लॅप डे ते ब्रेक अप डे अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात हे 7 दिवस; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रेमाची भावना आणि व्याख्या सुद्धा बदलली आहे. तर नात्यामधील प्रेम हे कुठेतरी हरवले असल्याची जाणीव बहुतांश जणांना होते.त्यामधून एकमकेकांमध्ये भांडण, निराशा अशा गोष्टी आपल्या वाटेला येतात. पण अॅन्टी व्हॅलेनटाईन हा एखाद्याचा सूड घेण्यासाठी नव्हे तर एका मजेशीर पद्धतीने साजरा करायला हवा.