Slap Day 2019: 'व्हेलेंटाईन डे' नंतर लगेचच 'स्लॅप डे' का साजरा केला जातो?
मात्र व्हेलेंटाईन डे नंतर अगदी लगेचच म्हणजे 15 फेब्रुवारीला अँटी व्हेलेंटाईन वीक (Anti-Valentine's Week) ला सुरुवात होते.
Anti-Valentine Week 2019: 14 फेब्रुवारीला जगभरात 'व्हेलेंटाईन डे' (Valentine's Day) अगदी उत्साहात साजरा केला जातो. मात्र व्हेलेंटाईन डे नंतर अगदी लगेचच म्हणजे 15 फेब्रुवारीला 'अँटी व्हेलेंटाईन वीक' (Anti-Valentine's Week) ला सुरुवात होते. हा 'अँटी व्हेलेंटाईन वीक' 15 ते 21 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. हा आठवडा 'स्लॅप डे' पासून सुरु होत 'ब्रेकअप डे' ला संपतो. प्रेमी युगुलांसाठी जसा व्हेलेंटाईन वीक खूप खास असतो. त्याचप्रमाणे सिंगल किंवा प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी हा आठवडा खास असतो. अँटी व्हेलेंटाईन वीकची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत असून पहिला दिवस स्लॅप डे (Slap Day) म्हणून साजरा करण्यात येतो.
प्रेमात त्रास देणारे, धोका देणारे यांना धडा शिकवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेकदा छेडछाडी, पाठलाग, ब्लॅकमेल याला अनेक मुली किंवा मुलेही त्रासलेली असतात. प्रेमाच्या सुंदर भावनेवर जेव्हा ईर्ष्या, जबरदस्ती, संशय यांसारख्या भावना वरचढ होतात. तेव्हा त्या व्यक्तीला चुकीची जाणून करुन देणे गरजेचे असते. त्यासाठी अनेकदा कानाखाली मारणे (स्पॅलिंग) चा आधार घेतला जातो. प्रेमाच्या नात्यात होणारा त्रास, अत्याचार याविरोधात आवाज उठवण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो.
स्लॅप डे नंतर किक डे (Kick Day), परफ्युम डे (Perfume Day), फ्लर्टिंग डे (Flirting Day), कन्फेशन डे (Confession Day), मिसिंग डे (Missing Day) आणि मग ब्रेकअप डे (Break-Up Day) असे हे आठवडाभर सेलिब्रेशन चालते.