Shubh Vivah Muhurat 2020-21: देवउठनी एकादशी झाल्यानंतर डिसेंबर ते पुढच्या वर्षातले लग्नासाठीचे शुभ मुहूर्त जाणून घ्या
परंतु 2021 मध्येही कोणतेही मोठे मुहूर्त नाहीत. जाणून घेऊयात मुहूर्त
हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि पुण्य मानली जाणारी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षावर साजरी केली जाते. ही देवउठनी एकादशी 25 नोव्हेंबर, बुधवारी आहे, त्याला हरिप्रबोधिनी आणि देवोत्थान एकादशी म्हणून ओळखले जाते.या एकादशी नंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात.आज आपण जाणून घेऊयात देवउठनी एकादशी नंतर आणि २०२१ मध्ये लग्नाचे कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत. (Tripurari Purnima 2020 Date: त्रिपुरारी पौर्णिमा यंदा कधी? जाणून घ्या कार्तिकी पौर्णिमेचं महत्त्व )
कोरोनामुळे यावर्षी लग्न करणार्या लोकांना मोठ्या संख्येने अतिथींची अनुपस्थिती आणि लग्नात केवळ 50 ते 100 लोकांची उपस्थिति यासारख्या अनेक गोष्टींचे पालन करावे लागले त्यामुळे अशा परिस्थितीत बरीच विवाहही पुढे ढकलण्यात आली आहेत. परंतु 2021 मध्येही कोणतेही मोठे मुहूर्त नाहीत. जाणून घेऊयात मुहूर्त (Rani Lakshmibai Jayanti: ब्रिटीश सत्तेला आव्हान देणार्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी! )
नोव्हेंबरमध्ये फक्त तीन मुहूर्त
25 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर
डिसेंबर शुभ मुहूर्त
1 डिसेंबर 6 डिसेंबर 7 डिसेंबर 9 डिसेंबर 10 डिसेंबर 11 डिसेंबर
15 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत मलामास असेल त्यामुळे त्या दरम्यान कोणताही शुभ मुहूर्त नसेल.त्यानंतर १७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत देव गुरु अस्त असणार त्यामुळे त्या दरम्यान कोणताही शुभ मुहूर्त नसणार आणि हे सर्व जानेवारी पासून मार्च पर्यंत सुरु राहणार आहे त्यामुळे या तीन महिन्यात एक ही लग्नासाठीचा शुभ मुहूर्त नाही.त्यानंतरच्या महिन्यातील शुभ मुहूर्त खाली दिल्याप्रमाणे असतील
एप्रिल 2021 शुभ मुहूर्त - 25, 26, 27, 28, 30
मे 2021 शुभ मुहूर्त - 2, 4, 7, 8, 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 26, 29, 30, 31
जून 2021 शुभ मुहूर्त - 5,6, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 26, 28, 30
जुलै 2021 शुभ मुहूर्त - 1, 2, 3, 7, 15, 18