स्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!
चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन म्हणून ओळखला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन 26 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे.
Shri Swami Samartha Songs: महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन (Shri Swami Samartha Prakat DIn) म्हणून ओळखला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन 26 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते. मराठी सिनेसृष्टी, टेलिव्हिजन क्षेत्रामध्येही अक्कलकोट महाराजांच्या महात्म्यावर काही खास कलाकृती साकारण्यात आल्या. जगभर पसरलेल्या स्वामींच्या भक्तांना कठीण काळामध्ये पुन्हा आशेचा किरण देण्यासाठी त्यांची काही अशीच भक्तीमय गीतं मदतीचा हात ठरतात. मग प्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांनी गायलेलं नाव स्वामींचे येता माझा ठाई रे.... हे गाणं असू दे किंवा सुरेश वाडकरांचा स्वरसाज असलेला स्वामी समर्थांचा जपमंत्र... ही सारीच गाणी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी खास आहेत.
स्वामी समर्थ यांचा जपमंत्र
महाराष्ट्रात स्वामींच्या मठात, घरी ध्यान, स्मरण करताना स्वामी भक्त या जपमंत्राने नामस्मरण करतात
नाव स्वामींचे येता माझा ठाई रे....
नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... हे गाणं खास अल्मब साठी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गायलं असून त्याचं संगीत सलील कुलकर्णींनी केलं आहे. हे गाणं येताच अल्पावधीत लोकप्रिय झालं आहे.
निःशंक होरे मना
स्वामी समर्थ तारक मंत्र
गजर
सुमारे 19 व्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते. धार्मिक संदर्भानुसार, अक्कलकोट मध्ये खूप काळ वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर भगवान श्रीदत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. अशी देखील धारणा आहे. सुमारे 1856 मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि 22 वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)