IPL Auction 2025 Live

Shravani Somvar 2022 Wishes: श्रावणी सोमवार च्या शुभेछा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरं करा मंगलपर्व

म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधत शिव शंकाराच्या भक्तांना शुभेच्छा देऊन साजरा करा आजचा दिवस.

Shravani Somvar | File Image

Happy Shravani Somvar: महाराष्ट्रामध्ये यंदा 29 जुलै पासून श्रावण (Shravan) महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिना सण,समारंभ आणि व्रत वैकल्यांनी भरलेला असल्याने या महिन्यासाठी हिंदू धर्मीय अधिक उत्सुक असतात. श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शंकराचे उपासक विशेष व्रत ठेवतात. पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somvar) यंदा 1 ऑगस्ट दिवशी आहे. म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधत शिव शंकाराच्या भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडीयात फेसबूक, इंस्टाग्राम वरून तुम्ही श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा Images, Wishes, Quotes, Greetings शेअर करून देऊ शकता.

श्रावणी सोमवारी एका विशिष्ट धान्याची मूठ शंकराला अर्पण करण्याची रीत आहे. त्यासोबतच शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि दूधाचा अभिषेक केला जातो. श्रावणात पहिल्या सोमवारी तांदूळाची शिवमूठ दिली जाते. मग यंदा श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार तुमच्या प्रियजनांच्या, नातेवाईकांच्या आयुष्यात खास करण्यासाठी ही शुभेच्छापत्र डाऊनलोड करू शकता. नक्की वाचा: Shravani Somvar 2022 Dates: महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत यंदा 1 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?

 श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

Shravani Somvar | File Image
Shravani Somvar | File Image
Shravani Somvar | File Image
Shravani Somvar | File Image
Shravani Somvar | File Image

समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.