Shravani Somvar 2022 Dates: महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत यंदा 1 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?
त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
Maharashtra Shravani Somvar 2022 Dates: हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण (Shravan) महिन्याची सुरूवात यंदा 29 जुलै पासून होणार आहे. श्रावण महिना म्हणजे सण आणि व्रत- वैकल्यांची रेलचेल असल्याने या महिन्याबद्दलची उत्सुकता अधिक असते. श्रावणी सोमवार, मंगळवार, शुक्रवारी खास पूजा करण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवार हे व्रत शंकरासाठी असते. या महिन्यात प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ (Shivmuth) भगवान शंकराला अर्पण करण्याची पद्धत आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरूवात जरा जिवंतिका पूजनाने होणार आहे. आता कोरोना संकट आटोक्यात आल्याने मागील दोन वर्ष जसे निर्बंधांत सण साजरे झाले आहेत त्यामधून यंदा भाविकांची सुटका होणार असल्याने या पवित्र महिन्यात पुन्हा मंदिरं भाविकांनी फुलून जाणार आहेत.
शंकराच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवारी पूजा करताना बेल, दूध यांचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. मग जाणून घ्या यंदा कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती मूठ दिली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा .
श्रावणी सोमवार 2022 शिवमूठ वेळापत्रक
- पहिला श्रावणी सोमवार - 1 ऑगस्ट 2021 - तांदूळ शिवमूठ
- दुसरा श्रावणी सोमवार - 8 ऑगस्ट 2021 - तीळ शिवमूठ
- तिसरा श्रावणी सोमवार - 15 ऑगस्ट 2021 - मूग शिवमूठ
- चौथा श्रावणी सोमवार - 22 ऑगस्ट 2021 - जव शिवमूठ
चातुर्मासामधील सर्वात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची रीत आहे. समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
(टीप- सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. या लेखातील मतांचे लेटेस्टली कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही.)