Shravani Somvar 2020 Wishes: पहिला श्रावणी सोमवार शुभेच्छा Wishes, Messages, GIFs च्या माध्यमातून शेअर करून साजरे करा मंगलपर्व!

शिवशंकराच्या भक्तांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस आणि HD Images!

Shravani Somavar | Photo Credits: File Photo

Shravani Somvar 2020 Marathi Wishes and Messages:  श्रावण महिन्यातील सोमवार शिव शंकराच्या भक्तांसाठी खास असतो. अनेकजण श्रावणी सोमवारचं (Shravani Somvar) व्रत करतात. यंदा महाराष्ट्रामध्ये पहिला श्रावणी सोमवार, 27 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. यंदा राज्यात कोरोना व्हायरसचं सावट असल्याने शिव शंकराच्या भक्तांना मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराचं (Lord Shankar) दर्शन घेणं शक्य नाही. मात्र यंदा सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून श्रावणी सोमवारचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि तुमच्या प्रिजनांवर, कुटूंबावर शंकराची कृपादृष्टी कायम रहावी म्हणून खास ग्रीटिंग्स, शुभेच्छा, मेसेजेस, GIFs यांच्या माध्यमातून मराठमोळी ग्रीटिंग्स पाठवून शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली कडून बनवण्यात आलेली ही शुभेच्छापत्र शेअर करा आणि पहिल्या श्रावणी सोमवारचा आनंद द्विगुणित करा.

श्रावणी सोमवारी शंकराची पुजा करून पिंडावर दूधाचा अभिषेक आणि बेलपत्र वाहण्याची पद्धत असते. तसेच शंकराची आराधना करण्यासाठी मंत्रोच्चार, जप केला केला जातो. Shravan Somvar 2020 Date: शिवभक्तांसाठी खास असलेले श्रावणी सोमवार यंदा कधी? पहा, कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

Shravani Somavar | Photo Credits: File Photo

via GIPHY

Shravani Somavar 2020 Images (PC - File Image)

via GIPHY

Happy Shravan Somvar Marathi Messages (Photo Credits: File Image)

समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्य जातीवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. तसेच कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. पौराणिक कथांनुसार पार्वतीनेही श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले, महादेवाला प्रसन्न केले आणि विवाह केला.