Shivrajyabhishek Tithi 2021 Wishes: शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार मराठी स्टेटस, Messages, Images च्या माध्यमातून द्या शिवप्रेमींना शुभेच्छा!
Shivrajyabhishek Din Tithi 2021 Wishesहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा येत्या 23 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे.
Shivrajyabhishek Din Tithi 2021 Wishes: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा येत्या 23 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार साजरा केला जाणार आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शिवराज्याभिषेक दिन अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. खरंतर शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1974 रोजी झाला होता. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक सोहळा यंदा तिथीनुसार 23 जून ला साजरा होणार आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून राज्य सरकारने शिवराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठमोळे मेसेज, Wishes, Wallpapers, Facebook Post, WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून द्या शिवप्रेमींना शुभेच्छा!(Vat Purnima 2021 Date and Timing: वट पौर्णिमाच्या दिवशी स्त्रिया करणार पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत; तारीख, महत्व आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून)
लौकिक राजाच्या
किर्तीचा क्षीतिजापार गेला
महाराष्ट्रभुमीचा स्वामी छत्रपती झाला
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुवर्ण दिवस स्वराज्य स्थापनेचा
दिवस उत्साहाचा आणि उर्जेचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देवास, देशास, धर्मास ज्याने संरक्षिले युक्ती, बुद्धी, बलाने योजिता जिवना लोककल्यानकाजी वंद्य ते आम्हा राजा शिवाजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नगारखाण्यात नगारा वाजतोयरायगडी आवाज घुमतोयगनिमांचा फज्जा उडवुनीमाझा राजा सिंहासनी बसतोयशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तिशाली मुगल सामराज्याला टक्कर देत स्वराज्य स्थापन केले. त्या काळात औरंगजेब हा जगातील एका शक्तिमान राजांपैकी होती. अशा शक्तीला तोडीस तोड टक्कर देत शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे ते राजे झाले होते. परंतू, त्यांच्या राज्याभिषेक झाला नव्हता. जो पर्यंत राज्याभिषेक होत नाही तोवर राजा मानण्याची तेव्हा पद्धत नव्हती. अखेर त्यांनी राज्याभिषेक केला आणि ते हिंदीव स्वराज्याचे राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं स्वराज्य स्थापन केले.