Shivrajyabhishek Din 2025 Wishes: शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Status, Wishes

आजही शिवराज्याभिषेक दिनी नागरिक रायगडावर मोठी गर्दी करतात. राज्य सरकार कडून ही या दिवशी शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. रायगडाला आकर्षक सजावट केली जाते.

Shivrajyabhishek Din 2025 Wishes: शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Status, Wishes
Rajyabhishekh | File Image

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला. या सोहळ्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची एक सार्वभौम राज्य म्हणून अधिकृत घोषणा झाली. त्यामुळे शिवभक्त दरवर्षी 6 जूनचं औचित्य साधून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. या निमित्ताने मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती झालेला शिवरायांना मानवंदना अर्पण केली जाते. WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings शेअर करत या दिवसाचा आनंद तुम्ही सोशल मीडीयात द्विगुणित करू शकता.

राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. हा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपतींच्या आयुष्यासोबतच मराठ्याच्या इतिहासातील देखील एक मोठी आणि मानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच या दिवशी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक झाला होता.

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Shiv Rajyabhishekh | File Image

निश्चयाचा महामेरु,

बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु
 श्रीमंतयोगी
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा..!
-------------------------

Shiv Rajyabhishekh | File Image

भरली इतिहासालाही धडकी
मातीत घडलं असं धाडसं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
माझ्या राजाच सोन्याचं
सिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
------------------------------

Rajyabhishekh | File Image

झाला तुझ्या चरणी अख्खा
महाराष्ट्र गोळा
थाटला हिंदवी स्वराज्याचा
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा !
-------------------------------

Rajyabhishekh | File Image

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
--------------------------------

Rajyabhishekh | File Image

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
कुशल प्रशासनकर्ते
छत्रपती श्रीशिवाजी महाराज
यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!

आजही शिवराज्याभिषेक दिनी नागरिक रायगडावर मोठी गर्दी करतात. राज्य सरकार कडून ही या दिवशी शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. रायगडाला आकर्षक सजावट  केली जाते.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 12:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).