Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारे द्या खास शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस, फेसबूक मेसेजेस, Wishes, Messages, Stickers च्या माध्यमातून तुम्ही खास मराठी शुभेच्छा देऊ शकता.

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes: भारतात क्वचितच असे लोक असतील जे छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नाहीत. शिवाजी महाराज देशाच्या शूर सुपुत्रांपैकी एक होते, ज्यांना 'मराठा अभिमान' म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान नायक देखील होते. 1674 मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यांनी अनेक वर्षे मुघलांशी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी मराठा कुटुंबात झाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती भारतात दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. यंदा त्यांची 392 वी जयंती साजरी केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस, फेसबूक मेसेजेस, Wishes, Messages, Stickers च्या माध्यमातून तुम्ही खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज डाऊनलोड करून तुम्ही शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Shivaji Maharaj Jayanti 2022: शिवजयंती निमित्त जाणून घ्या या खास गोष्टी, पाहा व्हिडीओ)

तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

|| जय शिवराय ||

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,

ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,

पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त

‘मराठी’ रक्तात होती.

जय भवानी जय शिवाजी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

(हेही वाचा, Shiv Jayanti 2022 Wishes: शिवजयंतीच्या शुभेच्छा, मराठी संदेश WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत शिवमय करा आजचा दिवस!)

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

जगातील एकमेव राजा असा आहे

ज्याने स्वतःसाठी एकही

राजवाडा महल नाही बांधला

तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,

श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!

शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

श्वासात रोखूनी वादळ,

डोळ्यांत रोखली आग,

देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes (PC - File Image)

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेसाठी ओळखले जात होते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी नौदलाची संकल्पना मांडणारे ते पहिले भारतीय शासक होते. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या बटालियनमध्ये अनेक मुस्लिम सैनिकांचीही नियुक्ती केली होती.