Shiv Rajyabhishek Din 2022 Wishes In Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा Quotes, WhatsApp Status द्वारा देत शिवप्रेंमीचा दिवस करा खास!

शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज करणारा आजचा दिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages द्वारा ही मराठमोळी शुभेच्छापत्रं नक्की शेअर करा.

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

Shivrajyabhishek Sohala 2022 Marathi Wishes:  महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले. याच ऐतिहासिक घटनेचं महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी 6 जून हा दिवस 'शिवराज्याभिषेक दिन सोहळा' (Shivrajyabhishek Din Sohala) म्हणून साजरा करतात. मग शिवरायांच्या आयुष्यातील या सुवर्णक्षणाची आठवण जागत शिवप्रेमींसोबतच तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुम्ही मराठमोठे मेसेजेस, शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत या दिवसाला थोडं खास करू शकतात. त्यासाठी खालील मेसेजेस, फोटोज डाऊनलोड करून शेअर करत तुम्ही शिवराज्याभिषेक दिन (Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Day Anniversary) सोशल मीडीयामध्ये साजरी करू शकता.

शिवराज्याभिषेक दिन मागील वर्षापासून महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होतो. मागील दोन वर्ष कोविड 19 मुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा होत होता पण यंदा मोठ्या जल्लोषात शिवरायांच्या वंशजांकडून शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा दिवस साजारा केला जाणार आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

निश्चयाचा महामेरू।

बहुत जनासी आधारू।

अखंडस्थितीचा निर्धारू।

श्रीमंत योगी।।

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

सुवर्ण दिन स्वराज्य स्थापनेचा

दिवस उत्साह अन उर्जेचा

शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक

दिनाच्या शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

शिवराज्याभिषेक दिनी

छत्रपती शिवाजी महाराजांना

मानाचा मुजरा

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

प्रौढ प्रताप पुरंदर

महापराक्रमी रणधुरंदर

क्षत्रिय कुलावतंश

सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

यंदा 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची' जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा' व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत. जसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या मार्गावर पालखी नेली जाणार आहे. पण रायगडावरील सोहळा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकणार नसलात तरीही ऑनलाईन त्याचे स्ट्रिमिंग पाहू शकणार आहात. त्यामुळे यंदा डिजिटल स्वरूपातही मोठ्या दणक्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज व्हा!