Shivaji Jayanti 2021 Messages: शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस
छत्रपती शिवाजी जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
Chhatrapati Shivaji Jayanti 2021 Messages: मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्या शिवाजी महाराजांचे विचार, सुविचार, स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फोटोच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. हे संदेश तुम्ही आपल्या मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेयर करू शकता. (वाचा - Shiv Jayanti 2021 HD Images: शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी Wishes, Messages, WhatsApp Status, Images शेअर करून द्या या खास दिवसाच्या शुभेच्छा)
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
यशवंत,
किर्तीवंत,
सामर्थ्यवंत,
वरदवंत,
पुण्यवंत,
नीतीवंत
जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
बघतोस काय मुजरा कर
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
निश्चयाचा महामेरु,|
बहुत जनांसी आधारु|
अखंड स्थितीचा निर्धारु|
श्रीमंत योगी||
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
||जय भवानी || जय शिवाजी ||
श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
वरील फोटो शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला शिवजयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. हे शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरदेखील शेअर करू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)