Shirdi Guru Purnima 2020 Utsav: साईबाबा संस्थानचे यंदा गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त रक्तदान, प्लाझ्मा दानचं आवाहन; रथ, पालख्या मिरवणूक रद्द
यंदा शिर्डीमध्ये देखील गुरू पौर्णिमा निमित्त दरवर्षी आयोजित भव्य गुरूपौर्णिमा उत्सव साधे पणाने साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाचं संकट गहिरं होत असताना त्याचा परिणाम सण- उत्सव, धार्मिक सोहळ्यांवरही दिसून येत आहे. यंदा शिर्डीमध्ये (Shirdi) देखील गुरू पौर्णिमा (Guru Purnima) निमित्त दरवर्षी आयोजित भव्य गुरूपौर्णिमा उत्सव (Guru Purnima Utsav) साधे पणाने साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. यावर्षी भाविकांशिवाय 4 ते 6 जुलै दरम्यान अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडेल. 5 जुलै म्हणजे गुरू पौर्णिमेदिवशी साई मंदिर संस्थान (Sai Mandir Sansthan) कडून गुरू पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रक्तदान (Blood Donation) आणि प्लाझ्मा दान (Plasma Donation) उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत श्री साईआश्रम मध्ये 1हजार रुम येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गुरू पौर्णिमा दरम्यान देखील भाविकांना प्रवेश बंदी कायम असेल. यंदा 4 जुलै ते 6 जुलै 2020 याकालावधीत साजरा करण्यात येणारा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून साईबाबांचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. Guru Purnima 2020 Wishes: गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून साजरी करा व्यास पौर्णिमा
शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरूवात 4 जुलै दिवशी होणार आहे. तर सांगता 6 जुलै दिवशी होणार आहे. यादरम्यान नित्य पूजा आणि इतर विधी, आरती वेळापत्रकानुसार होणार आहे.
दरवर्षी साईभक्त गुरू पौर्णिमा निमित्त पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल होतात. ते यंदा चित्र यंदा नसेल. राज्यात अजूनही जिल्हाबंदी कायम आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2020 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

