Shimga Wishes In Marathi: शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा, Messages, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा होळीचा सण!

तुम्ही देखील शिमगा मराठी संदेश, शिमगा प्रतिमा (Shimga Images), शिमगा व्हाट्सअॅप स्टेटस (Shimga Whatsapp Status), शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा शेअर करून तुमच्या प्रियजनांना खास मराठमोळी शुभेच्छापत्र पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Shimga Wishes In Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Shimga Wishes In Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील (मार्च) नवव्या चंद्रापासून पौर्णिमेपर्यंत शिग्मो किंवा शिग्मोत्सव उत्सव (Shigmotsav Festival) साजरा केला जातो. महाराष्ट्र तसेच गोव्यात राहणाऱ्या हिंदूंसाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे. आज सर्वत्र होळी (Holi 2025) म्हणजे शिमगा (Shimga 2025) सण साजरा होत आहे. याशिवाय, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग, गुलाल लावतात आणि आनंद साजरा करतात.

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. या दिवशी लोक शेणापासून बनवलेल्या गोऱ्यांची होळी पेटवतात. वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक म्हणून दरवर्षी शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shimgyacha Hardik Shubhechha in Marathi) देतात. तुम्ही देखील शिमगा मराठी संदेश, शिमगा प्रतिमा (Shimga Images), शिमगा व्हाट्सअॅप स्टेटस (Shimga Whatsapp Status), शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा शेअर करून तुमच्या प्रियजनांना खास मराठमोळी शुभेच्छापत्र पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (वाचा - Aamchya Darashi Hay Shimga Song Download: होळीच्या दिवशी 'आमचे दाराशी हाय शिमगा' गाणे ऐकून दुगुणीत करा शिगमोत्सवाचा आनंद!)

शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा - 

Shimga Wishes In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)
Shimga Wishes In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)
Shimga Wishes In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)
Shimga Wishes In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)
Shimga Wishes In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

शिमग्याच्या दिवशी गावकरी पारंपारिक पोशाख परिधान करून गावातील मंदिरांमध्ये एकत्र येतात. तसेच ते ढोलांच्या तालावर मंदिराच्या अंगणात विविध लोकगीते गातात आणि त्यावर नृत्य देखील करतात. अनेक गावांमध्ये या दिवशी एकत्र होळी पेटवण्याची परंपरा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement