Jyotirao Phule Death Anniversary: महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळें सह या दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली
महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट च्या माध्यमातून आदरांजली वाहिली
स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न करुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या महात्मा जोतिबा फुले यांची आज 129 वी पुण्यतिथी. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. इथेच 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. स्त्रिया, दलित, कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात झाला.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट च्या माध्यमातून खास आदरांजली वाहिली.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट:
शरद पवार यांचे ट्विट:
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट:
नितीन गडकरी यांचे ट्विट:
प्रियंका गांधी यांचे ट्विट:
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शाहू महाराजांनीही सत्यशोधक चळवळीस पाठींबा दिला. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. अशाप्रकारे आजचा हा आधुनिक भारत घडवण्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व सत्यशोधक चळवळीचा फार महत्वाचा वाटा आहे.