Shab-e-Barat 2021: 'शब-ए-बारात'साठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी; 'मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करावे'

या महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसादरम्यानची रात्र ही शब-ए-बारात (Shab-e-Barat 2021) म्हणून साजरी केली जाते. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत

Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे आठवा महिना म्हणजे शबान. या महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसादरम्यानची रात्र ही शब-ए-बारात (Shab-e-Barat 2021) म्हणून साजरी केली जाते. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून, सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाच्यावतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.