Sarva Pitri Amavasya 2022: आज सर्वपित्री अमावस्या, आजच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी
पितृ पक्षाच्या दिवसांत लोक अनेक विशेष उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात पितृदोष राहत नाही आणि घरात सुख-समृद्धी नांदते. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला या काळात तर्पण किंवा पितृशांतीचे उपाय करता आले नाहीत, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता.
आज पितृ पक्षाचा (Pitru Paksha) शेवटचा दिवस म्हणजेचं सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitri Amavasya) आहे. पितृपक्षात पितरांची पूजा आणि तर्पण केले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. असे म्हणतात की पितृ पक्षाच्या काळात सर्व पितर पृथ्वीवर राहतात. यावर्षी पितृ पक्षाला 10 सप्टेंबरपासून (September) सुरू झाली असून तो 25 सप्टेंबरला म्हणजे आज संपणार आहे. पितृ पक्षाची समाप्ती आश्विन महिन्यातील अमावास्येला होते, या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. आज सर्वपित्री अमावस्या आहे. पितृ पक्षाच्या दिवसांत लोक अनेक विशेष उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात पितृदोष राहत नाही आणि घरात सुख-समृद्धी नांदते. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला या काळात तर्पण किंवा पितृशांतीचे उपाय करता आले नाहीत, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता.
तर्पण करणे
जर तुम्ही पितृ पक्षात पितरांना तर्पण करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही ते आजच्या दिवशी करू शकता. तर्पण केल्यास पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते.
दान करणे
सर्वपित्री अमावस्येला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे दान सर्वोत्तम मानले जाते.
ब्राह्मणाला भोजन देणे
सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नावाने अन्न बाहेर काढून मोकळ्या जागेवर किंवा घराच्या छतावर ठेवून कावळ्यास खावू घालणे शुभ समजल्या जातं. याशिवाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला घरी बोलावून जेवण तसेच वस्त्र आणि दक्षिणा देऊन आदरपूर्वक सेवा केल्यास पित्राचे विशेष आशिर्वाद मिळतात.
सर्वपित्री अमावस्या 2022 तिथी
सर्वपित्री अमावस्येला आज मध्यरात्री 03 वाजून 12 मिनीटांपासून सुरु झाली असुन उद्या म्हणजे २६ सप्टेंबरला रात्री 03 वाजून 23 मिनीटांनी संपेल. तरी आज संपूर्ण दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आहे. तरी तर्पण, पिंडदान, श्राध्द करण्यास आजचा दिवस सर्वोत्तम आहे.