Sant Gadge Baba Jayanti 2020: महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्याविषयी काही खास गोष्टी
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते.
Sant Gadge Baba Birth Anniversary 2020: महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार आणि थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची आज 144 वी जयंती. 23 फेब्रुवारी 1876 कोतेगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. संत गाडगे बाबांना सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा या गोष्टींमध्ये रुची होती. म्हणून त्यांनी गरिबी रहाणी स्विकारली होती. त्यांनी आपल्या कार्यातून, किर्तनातून लोकांना सामाजिक समानता, शिक्षण आणि स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे 20 व्या शतकात समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग होता त्यात संत गाडगे बाबांचे नाव आर्वजून घेतले जाते. संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव देबूजी झिंगरजी जानोरकर असे होते.
संत गाडगे महाराजांचे कार्य शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही इतके महान आहे. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते.
जाणून घेऊन अशा या महान समाजसुधारकबद्दल काही खास गोष्टी:
1. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेंडगावात एका धोबी कुटुंबात त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये झाला.
2. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखूबाई झिंगराजी जानोरकर हे होते.
3. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत.
4. अतिशय साधे राहणीमान असलेले गाडगे बाबा गावात फिरुन रस्ते, गटारे साफ करत. त्याबदल्यात गावातील लोक त्यांना पैसे देत. ते पैसे सामाजिक विकास आणि समाजाच्या विकासासाठी करतं.
5. या मिळालेल्या पैशातून त्यांनी गावात शाळा, धर्मशाळा, रुग्णालये आणि जनावरांसाठी आश्रय स्थळे बांधली. Sant Gadge Baba Death Anniversary: स्वच्छता आणि समाजकार्याला आयुष्य अर्पित केलेल्या संत गाडगे बाबा यांच्याविषयी काही रोचक गोष्टी; जाणून घ्या
6. या थोर समाजसुधारकांनी कधीच कोणतेही मंदिर बांधले नाही त्याउलट समाजाच्या दृष्टीने हितावह अशा गोष्टी शाळा, गोशाळा, सार्वजनिक उपचार केंद्रे बांधली.
7. गाडगे बाबा यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ ठेवणाऱ्या गावकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
8. अमरावती विद्यापीठाचे नाव देखील बाबांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
9. संत गाडगे बाबा यांनी 20 डिसेंबर 1956 मध्ये वलगाव, अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला. बाबांनी आपल्या अनुयायांना मरणाआधी सांगितले होते की मी जिथे मरेन त्याच जागी माझे अंत्यसंस्कार करा. तसेच माझी कोणतीही मूर्ती किंवा स्मारक बांधू नका.
10. बाबांनी जिकडे मरण पावले ते जागा गाडगे नगर म्हणून ओळखली जाते.
संत गाडगे बाबा आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे विचार, त्यांची शिकवणूक आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. अशा या महान समाजसुधारकाला आज त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!