Sant Gadge Baba Birth Anniversary 2019: शिक्षण, स्वच्छता, मानवता यांचा प्रसार करणाऱ्या 'संत गाडगेबाबा' यांच्या बद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी!

23 फेब्रुवारी ला गाडगे बाबा यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव देबूजी झिंगरजी जानोरकर असे होते.

Sant Gadge Baba (Photo Credits: Laxman Raut/ Facebook)

Sant Gadge Baba Birth Anniversary 2019: राष्ट्रीय संत गाडगेबाबा (Sant Gadge Baba) यांची आज जयंती. 23 फेब्रुवारी ला गाडगे बाबा यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव देबूजी झिंगरजी जानोरकर असे होते. त्यांनी समाजाला मानवता, शिक्षण, सामाजिक समानता आणि स्वच्छतेचा संदेश दिला. ते एक महान राष्ट्रीय संत होते. महाराष्ट्रातील लोकप्रिय समाजसुधारकांपैकी एक म्हणून गाडगे बाबा यांचे नाव आर्वजून घेतले जाते.

गाडगेबाबांच्या दृष्टीने शिक्षणाला अधिक महत्त्व होते. ते म्हणत, पैशांची कमतरता असल्यास भांडी विका, कमी किंमतीचे कपडे खरेदी करा, लहानशा-साध्याशा घरात राहा पण मुलांना शिक्षण अवश्य द्या.

संत गाडगे बाबा यांचे कार्य

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेंडगावात एका धोबी कुटुंबात त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये झाला. ते चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. राहणीमान अतिशय साधे असणारे बाबा वेगवेगळ्या गावात फिरून रस्ते, गटारे साफ करत असतं आणि काम झाल्यानंतर गावातील लोकांचे अभिनंदन करतं. त्यांच्या कामाबद्दल गावातील लोकं त्यांना पैसे देत. या पैशांचा वापर ते सामाजिक विकास आणि समाज्याच्या शारीरिक विकासासाठी करतं. लोकांकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी गावात शाळा, धर्मशाळा, हॉस्पिटल्स, जनावरांसाठी आश्रमे बांधली.

गावाची स्वच्छता करुन झाल्यानंतर ते संध्याकाळी किर्तनाचे आयोजन करत. आपल्या किर्तनातून लोकोपकार आणि समाज कल्याणचे शिक्षण त्यांनी दिले. त्याचबरोबर ते लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतं. आपल्या किर्तनात ते संत कबीरांचे दोहे ऐकवतं.

संत गाडगे बाबा यांनी जनावरांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केले. तसंच जातीभेद, वर्णभेदाची भावना जनमानसातून दूर करण्याचा आणि याविरोधात लोकांना जागृक करण्याचे कार्य त्यांनी केले. इतकंच नाही तर समाजात दारु बंदी करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. गाडगे महाराज यांनी लोकांना कठोर परिश्रम, साधी राहणी, परोपकार या भावना जागृत करण्यासाठी शिक्षण दिले. इतकंच नाही तर त्यांनी पत्नी आणि आपली मुले यांना देखील याच मार्गाने जाण्याची शिकवण दिली.

गाडगे बाबा यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ ठेवणाऱ्या गावकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अमरावती विद्यापीठाचे नाव देखील बाबांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. 20 डिसेंबर, 1956 मध्ये त्यांनी देहत्याग केला. मात्र त्यांच्या शिकवणूकीने आणि विचारांनी आजही ते लोकांच्या मनात जिवंत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif