Sankashti Chhaturthi October 2022 Moon Rising Timings: संकष्टी चतुर्थी दिवशी व्रताची सांगता करण्यासाठी पहा चंद्रोदयाची वेळ काय?

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

गणेश भक्तांसाठी आजचा दिवसा खास आहे. दरा महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी ही संकष्टी चतुर्थी (Sankashti Chhaturthi) म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. या महिन्यात अश्विन महिन्यातील संकष्टी आज साजरी केली जाणार आहे. गणेशभक्तांच्या दृष्टीने संकष्टीचा उपवास/ दिवस/ व्रत हे दु:खांचा नाश करणारे, सुख, समृद्धी, आनंद आणणारे आहे त्यामुळे कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती दे या प्रार्थनेसह बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता गणरायाची आज पूजा -अर्चना केली जाते. काही भक्त दर महिन्याला संकष्टीचा उपवास करतात. या उपवासाची सांगता संध्याकाळी चंद्रोदयाने होते. मग आज तुम्ही देखील चंद्रोदयानंतर उपवास सोडणार असाल तर पहा तुमच्या शहरात किती वाजता होईल चंद्रोदय? (Sankashti Chaturthi HD Images: संकष्टी चतुर्थी निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Wishes शेअर करत खास करा आजचा दिवस!).

महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावात चंद्रोदय किती वाजता होणार?

मुंबई - 20.46

पुणे- 20.43

नाशिक - 20.40

रत्नागिरी- 20.48

गोवा- 20.49

बेळगाव- 20.45

नागपूर- 20.16

संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. आज करवा चौथ देखील साजरा केला जाणार आहे. करवा चौथचं व्रत प्रामुख्याने उत्तर भारतामधील महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य कायम राहो यासाठी ठेवले जाते.