Sankashti Chaturthi September 24 Chandrodaya Time: भाद्रपद महिन्यातील संकष्टी दिवशी जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

आज तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचा उपवास ((Sankashti Chaturthi Upvas) करणार असाल तर जाणून घ्या मुंबई ते गोवा तुमच्या शहरानुसार आज चंद्रोदयाच्या वेळा (Moon Rising Timings) नेमक्या काय आहेत?

Ganpati Bappa Morya | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आज गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अजून एक खास दिवस आहे. आज कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस अर्थात भाद्रपदी चतुर्थी आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि विनायकी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी चतुर्थीचं व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करून काही जण बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, दु:खांचा नाश करून आयुष्यात सुख, समाधान कायम राहो यासाठी प्रार्थना करतात. दरम्यान आजचा संकष्टी चतुर्थीचा उपवास हा रात्री चंद्रोदय (Chandroday) झाल्यानंतर सोडण्याची देखील रीत आहे. त्यामुळे आज तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचा उपवास ((Sankashti Chaturthi Upvas) करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरानुसार आज चंद्रोदयाच्या वेळा (Moon Rising Timings) नेमक्या काय आहेत?

संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाच्या आराधनेचा दिवस आहे. कला आणि विद्यांचा अधिपती, संकटमोचक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक ऐरवी बाप्पाच्या मंदिरांबाहेर गर्दी करत असतं पण सध्या कोविडची परिस्थिती पाहून राज्यात सारी प्रार्थनास्थळं बंद असल्याने आजही घरातच राहून गणरायाची पूजा करावी लागणार आहे.(Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!).

मुंबई पुणे ते गोवा मधील आजची चंद्रोदयाची वेळ काय?

संकष्टी चतुर्थीच्या नैवेद्यामध्ये बाप्पाच्या आवडीचा मोदक हा पदार्थ आवार्जुन ठेवला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी उकडीचे तर काही ठिकाणी तळणीचे मोदक करण्याची प्रथा आहे. या निमित्त साग्रसंगीत पूजा, बाप्पाची आरती करून संकष्टीचं व्रत रात्री चंद्रदर्शनानंतर सोडलं जातं.