Sankashti Chaturthi March 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आज जाणून घ्या मुंबई ते बेळगाव मध्ये चंद्रोदयाची वेळ काय?

या निमित्त उपवास असणार्‍यांसाठी चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची आहे.

Ganpati | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Sankashti Chaturthi March 2022: Chandroday: मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आज (21 मार्च) साजरी केली जात आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेश भक्तांसाठी मोठ्या उत्साहाचा असतो. गणरायाचं दर्शन करून, त्याची खास पूजा करून आणि काही मंडळी या दिवशी उपवास करून संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळतात. हिंदु मान्यतांनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत पाळणारी भक्त मंडळी रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर व्रताची सांगता करतात. बाप्पाला नमस्कार करत काही जण आरती करून मग दिवसभराचा उपवास सोडतात. मग आज तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर जाणून घ्या रात्री तुम्ही या व्रताची सांगता कधी करू शकाल?

गणपती बाप्पा आणि चंद्रदर्शन यांच्या पुराणात कहाण्या आहेत. तुम्ही जर त्या मानत असाल तर संकष्टीचं व्रत या चंद्रोदयाच्या वेळेनुसार सोडण्यासाठी पहा मुंबई ते नागपूर मध्ये किती वाजता आज होईल व्रताची सांगता. (Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!).

चंद्रोदयाची वेळ

मुंबई - 21.50

पुणे- 21.45

नाशिक- 21.47

गोवा- 21.41

रत्नागिरी- 21.45

नागपूर- 21.26

बेळगाव- 21.39

कृष्ण महिन्यातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थी म्हणून गणेश भक्त पाळतात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकटांचे हरण करण्यासाठी गणरायाकडे मागणं मागण्यासाठी अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि व्रत करतात. या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा, जास्वंदाची फुलं यांचा समावेश असतो. नैवेद्यामध्ये मोदक करण्याची पद्धत आहे. तसेच साग्रसंगीत जेवण देखील केले जाते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश  नाही.