Sankashti Chaturthi April 2020: संकष्टी चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणरायाची आराधना करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

फलप्राप्तीसाठी, धनलाभ, सुख-शांति नांदण्यासाठी गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले मागणे गणरायापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम असे म्हटलात तरी चालेल.

Sankashti Chaturthi April 2020: संकष्टी चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणरायाची आराधना करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी
Ganesh Jayanti | Photo Credits: Instagram

Sankashti Chaturthi 2020: विद्या आणि कलेची देवता म्हणून ज्याचा समस्त भक्त ज्याची आराधना करतात त्या गणरायासाठी पूजनीय असा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणाचाया चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. आपल्या आयुष्यातील विघ्न दूर व्हावी किंवा काही अनिष्ट घडू नये यासाठी श्रीगणेशाचा धावा करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे (Sankashti Chaturthi) व्रत करतात. हे व्रत करण्यामागे प्रत्येक भक्ताची श्रद्धा जोडली असते. त्यासोबतच फलप्राप्तीसाठी, धनलाभ, सुख-शांति नांदण्यासाठी गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले मागणे गणरायापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम असे म्हटलात तरी चालेल.

या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास धरुन रात्री चंद्रोदयनांतर उपवास सोडून अन्न ग्रहण करतात.

हेदेखील वाचा- Happy Sankashti Chaturthi 2019 Wishes: विघ्नहर्ता गणेशाच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमयी शुभेच्छा

संकष्टी चंद्रोदयाची वेळ:

संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आज पंचांगानुसार, रात्री 10.31 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे.

कसे कराल या दिवशी व्रत:

संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. आवश्यक वाटल्यास रात्री उपवास सोडण्याआधी पुन्हा आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ अथवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा फोटो) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणा-याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.

त्यानंतर संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. मग गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेशाची आरती करावी आणि गणेशासमोर नतमस्तक व्हावे. त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. तुम्ही उपवास सोडत असल्या कारणाने जेवणात गोड पदार्थ आणि मोदक असावेत. जेवण आटोपल्यानंतर उत्तर पूजा करुन गणेशाची मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2020 07:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).