Sankashta Chaturthi November 2023 Moon Rise Time: 30 नोव्हेंबरच्या संकष्टी चतुर्थी दिवशी पहा चंद्रोदयाच्या वेळा काय?
त्यामुळे पहा संकष्टीच्या चंद्रोदयाच्या वेळा काय?
नोव्हेंबर महिन्यामध्ये यंदा 2 संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi) आल्या आहे. 1 नोव्हेंबर नंतर आता महिना अखेरीस 30 नोव्हेंबरला देखील संकष्टी चतुर्थी येणार आहे. गणेश भक्तांंसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खास असतो. या दिवशी अनेकजण मनातील इच्छा पूर्ण होवोत या अपेक्षेने गणपती बाप्पा कडे व्रत करतात. या व्रताची सांगता चंद्रोदयानंतर केली जात असल्याने तुमच्या शहरानुसार 30 नोव्हेंबर दिवशी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये, गावामध्ये कोणत्या वेळी चंद्रोदय होणार आहे हे देखील नक्की जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. यंदा श्रावण महिन्यात अधिक मास आला होता. त्यामुळे 13 संकष्टी चतुर्थी देखील साजरा करण्यात येत आहेत. संकष्टी चतुर्थी निमित्त ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमयी शुभेच्छा! )
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाच्या वेळा
मुंबई 8.35 रात्री
पुणे 8.35 रात्री
नाशिक 8.31 रात्री
नागपूर 8.07 रात्री
औरंगाबाद 8.23 रात्री
इथे पहा तुमच्या शहरातील आजच्या चंद्रोदयाच्या वेळा काय?
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. नियमित संकष्टीचा उपवास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी साग्रसंगीत पूजा करतात. उपवासाच्या जेवणात कांदा-लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात.