Sambhaji Maharaj Punyatithi 2024 Messages: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp Status, Messages शेअर त्यांच्या स्मृतीला करा अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. त्यातच त्यांनी नरक यातना भोगून मृत्यू पत्करला.

File Image

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवसाचा आहे. यंदा ही फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल दिवशी आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनुसार छत्रपती संभाजी राजेंच्या पुण्यतिथी (Sambhaji Maharaj Punyatithi) निमित्त  Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करू शकतात. छत्रपती संभाजी राजे भोसले यांना कैद करून औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी संभाजी महाराजांवर वाघ नखाने वार करण्यात आला आणि भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे कुऱ्हाडीने शिरच्छेद करून ठार मारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ शिवप्रेमी आवर्जुन एकत्र येतात.

संभाजी स्वतः एक महान राजा आणि योद्धा म्हणून ओळखले जात होते. अवघे 2 वर्षांचे असताना आईच्या मायेचं छत्र हरवल्यानंतर जिजाऊंनी संभाजीराजेंना घडवलं. त्यामुळे शिवबांप्रमाणे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज देखील राजमाता जिजाबाईंच्या संस्कारांमध्ये वाढले. त्यांच्या शौर्याच्या गाथा आजच्या दिवशी नक्की पुढल्या पिढी पर्यंत पोहचवा.

छत्रपती संभाजी राजेंना अभिवादन

 

File Image

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक जाहला

स्वराज्याच्या मातीसाठी
शंभु  अमर जाहला
संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी अभिवादन
---------------------------

File Image

मराठा साम्राज्याचे दूसरे छत्रपती ,
शिवपुत्र संभाजी महाराज यांना
 पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन
---------------------

File Image

रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, सह्याद्रीला  विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता
 संभाजी महाराज यांना पुण्यतिथि कोटी कोटी प्रणाम!
 ----------------------

File Image

 महत प्रतापी शिवरायांचा
शूरवीर छावा
वंदन करितो बलिदानाला
जय 'शंभूराया'
-------------------

File Image

 कोंढण्यास तानाजी गेला...
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी जाहला...

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि त्यांचा सल्लागार कवी कलश यांना इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला आणि नरक यातना स्वीकारत मृत्यू पत्करला. त्यांच्या या समर्पणाला कोटी कोटी प्रणाम!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now