Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Messages: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस करा अभिवादन!
संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.
Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Messages: संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराज लहान असतानाचं त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी महाराजांचा सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केला. शिवाजी महाराजांप्रमाणेच शंभूराजांनी मराठा साम्राजाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.
मराठ्यांच्या इतिहासात संभाजी राजांनी मोठी कामगिरी केली आहे. आज संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Jyotiba Phule Jayanti 2021 Quotes: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्याचे खास प्रेरणादायी विचार)
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
जिथे संभाजीभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!! अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!
शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
एक छोटे पाऊल लहान ध्येयाकडे नेतो,
परंतु तेच छोटे लक्ष नंतर मोठे लक्ष्य प्राप्त करू शकते.
पुण्यतिथीनिमित्त संभाजी महाराज यांना शत् शत् नमन
शत्रू कमकुवत आहे याचा जास्त विचार करू नका,
आणि त्यांच्या सामर्थ्याला जास्त महत्व देऊ नका.
पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
संभाजी सांगायला सोपे आहेत, संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
दरम्यान, इ.स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना दगाफटका करून औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखानने संभाजीराजे व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. त्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्यांना ठार मारण्यात आले.