Rose Day 2020: जगभरात 7 फेब्रुवारी ला का साजरा केला जातो 'रोझ डे'? जाणून घ्या गुलाबाच्या प्रत्येक रंगात दडलेला प्रेमाचा अर्थ

हा दिवस साजरा करण्यामागे असेही सांगितले जाते महाराणी व्हिटोरियाच्या काळात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. मात्र गुलाबाच्या विविध रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

Rose Color (Photo Credits: PixaBay)

Rose Day 2020 Importance: जगभरातले प्रेमीयुगुल, जोडपी वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस व्हॅलेंटाईन जे आता काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. 14 फेब्रुवारीला येणा-या व्हॅलेंटाईन डे आधी 7 दिवस व्हॅलेनटाईन डे सप्ताह असतो. ज्यात वेगवेगळ्या दिवसांचा समावेश असतो. या सप्ताहात पहिला येणारा दिवस म्हणजे 'Rose Day'. 7 फेब्रुवारीला प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डे सप्ताह सुरु होतो ज्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे या दिवसांचा समावेश आहे.

व्हॅलेंटाईन सप्ताहाचा पहिला दिवस म्हणून रोझ डे ची ओळख असली तरीही हा दिवस का साजरा केला जातो हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. तरुण प्रेमी मनांचा उत्सव म्हणून जरी व्हॅलेंटाईन डे कडे पाहिले जाते. पण याची सुरुवात 14 व्या शतकात झाली. खरं तर त्याही पेक्षा आधी म्हणजे तिसऱ्या शतकात ए. डी. सम्राट क्लॉडियस (AD emperor claudius) याने दोन माणसांना मारुन टाकण्याचा आदेश दिला होता. त्या दोघांचेही नाव व्हेलेंटाईन होते. त्यानंतर संत व्हॅलेंटाईनने बहिष्कार केलेल्या कपल्सचे लग्न करुन दिल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आली होती. त्याच्या या बलिदानाची खूप चर्चा झाली आणि मग प्रेमाचा उत्सव सुरु झाला. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे व्हेलेंटाईन वीकची सुरुवात 'रोज डे 'ने होणे यात काहीच आश्चर्य नाही.

हा दिवस साजरा करण्यामागे असेही सांगितले जाते महाराणी व्हिटोरियाच्या काळात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. मात्र गुलाबाच्या विविध रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

1) लाल गुलाब (Red Rose)

लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे. लाल रंगामध्येच 'रोमांस' आणि 'पॅशन' आहे. त्यामुळे प्रेमाची भावना थेट व्यक्त करायची असेल तर लाल रंगापेक्षा दुसरा पर्याय नाही.

2) पिवळा गुलाब (Yellow Rose)

तुमच्या निखळ मैत्रीची भावना मोकळी करायची असेल तर पिवळ्या रंगाचं गुलाब द्या. आनंद, उत्साह जपण्यासाठी हा रंग बोलका आहे. त्यामुळे किमान तुमच्यामधील मैत्री जपायची असेल तर पिवळ्या रंगाचं गुलाब तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजारी व्यक्तीला आजारपणातून लवकर बाहेर पडावं या शुभेच्छा देण्यासाठी पिवळ्या रंगांचं गुलाब दिलं जाते.

3) गुलाबी गुलाब (Pink Rose)

गुलाबी रंगाचं गुलाब अत्यंत मोहक दिसतं. या गुलाबाच्या माध्यमातून तुमच्या मनातील भावना पोहचवताना त्यामधून अफेक्शन, अ‍ॅडमिरेशन व्यक्त होतं. गुलबी रंगाची छटा जशी गडद होते तसं तुमच्यातील साथीदाराबद्दल कृतज्ञता, जिव्हाळा याची कबुली देता येते. तुमच्यामधलं 'बेस्ट फ्रेंड'चं नातं या गुलाबातून व्यक्त होतं. Valentine Week 2020 List: यंदा रोझ डे ते वेलेंटाइन डे 2020 ची संपूर्ण लिस्ट PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

4) पांढरं गुलाब (White Rose)

पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. लाल रंगापूर्वी पांढरा रंग हा प्रेमाचं प्रतिक होता. पण आजही पांढरा रंग तुमच्यामधील प्रामाणिकपणा आणि पावित्र्याचं प्रतिक समजलं जातं. प्रेमातील पावित्र्याची कबुली देण्यासाठी पांढरा रंग वापरा. प्रामुख्याने लग्नामध्ये याच कारणासाठी प्रेमाचा नितळपणा दर्शवण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. नात्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावर या रंगातून प्रेम व्यक्त केलं जातं. पांढरं गुलाब म्हणजे ‘I am thinking about you' असा त्याचा अर्थ आहे.

5) लॅव्हेंडर गुलाब (Lavender Rose)

लॅव्हेंडर हा रंग दिसायलाही अत्यंत मोहक आहे. या रंगाला पाहून मनात जशा भावना येतात तशाच त्या व्यक्त करण्यासाठी या रंगाचं गुलाब वापरलं जातं. लक्ष वेधून घेणार्‍या व्यक्तिमत्त्वाला तुमच्या मनातील भावना बोलून दाखवायच्या असतील तर या रंगाचा वापर करा.

6) नारंगी गुलाब 

पॅशन आणि आनंद या दोन्ही भावनांचा मिलाफ म्हणजे नारंगी रंगाचं गुलाब. प्रेम, मैत्री, अ‍ॅडमायरेशन देण्यासाठी नारंगी रंग मदत करतो. तुमचा साथीदार तुमच्यासोबत असल्याचा तुम्हांला गर्व असेल तर ती भावना समोरच्या व्यक्तीला नारंगी रंगाच्या गुलाबातून व्यक्त करा. तुमच्यामधील पॅशन आणि प्राईड यांचं ते प्रतिक आहे.

रोझ डे हा काही दिवसांवरच येऊन ठेपलाय त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला कोणतं गुलाब द्यायचं ते लवकर ठरवा. एक लक्षात ठेवा रंग कोणताही असो त्यामागच्या तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे जास्त महत्त्वाचे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement