Republic Day Dress Ideas: 'प्रजासत्ताक दिन' निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी 'या' वेशभूषा साकारून करा आपल्या मुलांना तयार

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र भारताची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 26 जानेवारी 1950 पासून भारतातील प्रजेची सत्ता सुरू झाली.

Republic Day fancy dress costume for kids (photo Credits: pxfuel)

Republic Day Dress Ideas: दर वर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day 2020) साजरा केला जातो. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र भारताची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 26 जानेवारी 1950 पासून भारतातील प्रजेची सत्ता सुरू झाली.

भारतात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. राजधानी दिल्ली येथे या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. या दिवशी भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी मोठी मिरवणूक काढली जाते. याव्यतिरिक्त भारतातील सर्व राज्यातील शाळांमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजवंदन आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. तसेच या दिवशी शाळांमध्ये मिठाई, चॉकलेट आणि खाऊचे वाटप केले जाते. त्यामुळे हा दिवस लहान मुलांसाठी एक प्रकारची परवणीच ठरतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही शाळांमध्ये लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धसाठी मुलांना कोणते कपडे घालावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. चला तर मग जाणून घेऊयात वेगवेगळ्या वेशभूषांविषयी...(वाचा - Republic Day 2020 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून व्यक्त करा देशप्रेम!)

भारत माता - Bharat Mata

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांना भारत माताची वेशभूषा करू शकता. यासाठी तुम्हाला पांढऱ्या, केशरी आणि हिरव्या रंगाची साडी लागेल. छान मेकअप करून झाल्यावर डोक्यावर सोनेरी रंगाचा मुकुट घाला. तसेच आपल्या मुलाच्या हातात तिरंगा दिल्यास तुमच्या मुलाचा भारत माता लुक आणखी खुलून दिसेल. खालील व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्या मुलाला भारत मातेची वेशभूषा करू शकता.

महात्मा गांधी - Mahatma Gandhi

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून तुमच्या मुलाचा हटके लुक साकारू शकता. ही वेशभूषा साकारणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला केवळ पांढऱ्या रंगाचे धोतर, सुती पंचा, काठी आणि गोल भिंगाचा चष्मा लागेल.

भगत सिंग -

भगत सिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भगत सिंग यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाची भगत सिंगप्रमाणे वेशभूषा साकारू शकता. या वेशभूषेमध्ये लहान मुलं अगदी क्युट दिसतात.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस, भगत सिंह, राजगुरू, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, सय्यद अहमद खान, बंकीमचंद्र चॅटर्जी, दादाभाई नौरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या महान नेत्यांच्या वेशभूषा साकारून तुम्ही आपल्या मुलांचा हटके लूक बनवू शकता.