Republic Day 2021 Quotes: भारतीय 72 व्या प्रजासत्ताक दिन निमित्त देशभक्तीपर WhatsApp Status, Messages शेअर करून द्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा

यंंदा कोविड 19 चं भान ठेवत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन सावधपणे करताना सोशल मीडीयात मराठमोळे मेसेजेस, विशेज व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शेअर करत साजरा करा यंदा गणतंत्र दिवस

Republic Day 2021 (File Image)

Happy Republic Day 2021:  भारतामध्ये आज (26 जानेवारी)  72 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आहे. कोविड 19 चंं त्यावर यंदा सावट असलं तरीही उत्साह नागरिकांच्या मनात कायम आहे.  15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून ते अंंमलात आले. याच दिवसापासून देशात लोकशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. म्हणूनच दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day 2021) म्हणून साजरा केला जातो. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केले व याचदिवसापासून भारताची राज्यघटना लागू झाली. (हेही वाचा: Republic Day 2021 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण!)

घटनासभेने जवळपास तीन वर्षात (2 वर्षे 11 महिने 17 दिवस) भारताची राज्यघटना तयार केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. तर खास मराठी Wishes, Images, WhatsApp Stickers, Messages, Quotes शेअर करून तुम्ही देऊ शकता राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाच्या शुभेच्छा.

Republic Day 2021
Republic Day 2021
Republic Day 2021
Republic Day 2021
Republic Day 2021
Republic Day 2021

 

दरम्यान, 26 जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी दरवर्षी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. यावेळचे खास आकर्षण असते ते म्हणजे विविध राज्यांनी पाठवलेल त्यांचे चित्ररथ. प्रत्येक राज्य आपली संस्कृती दर्शवत आपल्या खास चित्ररथाचे प्रदर्शन करते. भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते.