Ratha Saptami: माघ महिन्यातील सप्तमीला का म्हणतात रथ सप्तमी, जाणून घ्या आजच्या दिवसाचे विशेष महत्व
पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणून आजच्या दिवशी रथ म्हणजेचं सप्तमीला सुर्य देवताची मनोभावे पुजा केली जाते.
माघी सप्तमी म्हणजेचं यावर्षी रथ सप्तमी 28 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणून आजच्या दिवशी रथ म्हणजेचं सप्तमीला सुर्य देवताची मनोभावे पुजा केली जाते. रथ सप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो. सूर्य सप्तमीला नर्मदा जयंती आणि भीष्म अष्टमीचा उत्सवही साजरा केला जातो. रथ सप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि तो हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथावर बसला होता, अशी हिंदू पुराण कथेनुसार आख्यायिका आहे.
रथ सप्तमी मुहूर्त आणि पुजाविधी:-
रथ सप्तमीचा मुहूर्त म्हणजेचं माघ शुक्ल सप्तमी २८ जानेवारीला म्हणजेचं सकाळी 09.10 सुरुवात झाली असुन २९ जानेवारी सकाळी 08.43 समाप्ती होणार आहे. सूर्य सप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून सूर्योदयाच्या वेळी आळकच्या पानावर ७ बोरी ठेवून सूर्याचे ध्यान करून स्नान केल्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. स्नान करताना ओम मार्तंडाय नमः मंत्राचा जप करा. नंतर लाल रंगाचे कपडे घाला.तांब्याच्या भांड्यात गंगेच्या पाण्यात तीळ, गूळ, लाल फुले टाकून ओम आदित्यय नमः मंत्राचा उच्चार करताना भगवान भास्कराला अर्घ्य अर्पण करावे.आपल्या आजूबाजूला थोडे पाणी शिंपडा आणि नंतर त्याच ठिकाणी तीन वेळा प्रदक्षिणा करा. कुमकुम, लाल चंदन, लाफ फुलाने भगवान सूर्याची पूजा करा आणि नंतर त्यांना खीर अर्पण करा. (हे ही वाचा:- Vitthal Rukmini Vivah Sohla 2023: वसंत पंचमी च्या मुहूर्तावर आज विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळा; अज्ञात भाविकाकडून पावणे दोन कोटी रूपयांचे सोन्याचे दागिने दान)
सूर्य सप्तमीला तांबे, तीळ, गूळ, लाल वस्त्र, लाल फूल दान करा, यामुळे सूर्याशी संबंधित दोष दूर होतात. या दिवशी वडिलांची सेवा करा. आजच्या दिवशी सूर्य चालिसा पाठ करा आणि नंतर सूर्यदेवाची आरती करा. असे मानले जाते की या पद्धतीने सूर्यदेवाची पूजा केल्याने धन, आरोग्य आणि समृद्धी वाढते. तरी रथ सप्तमी हा उत्सव संपूर्ण दोशभरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.