Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Messages: राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे WhatsApp Status, Quotes
16 जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. या लढाईत स्वतः रणभूमीवर उतरलेल्या राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. ब्रिटिशांची दोन हात करताना त्या घायाळ झाल्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
‘मेरी झाशी नही दुंगी’अशी आरोळी ठोकत 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीश राजवटीला सामोरी गेलेल्या राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmi Bai) यांचे निधन 18 जून 1858 साली झाले. राणी लक्ष्मीबाई या नावाने त्या प्रसिद्ध असल्या तरीही त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. वाराणसी मध्ये एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. झासीचे राजा गंगाधर राव यांच्याशी त्यांचा वयाच्या 14 व्या वर्षी विवाह झाला होता. लग्नानंतर मणिकर्णिकेचे नाव लक्ष्मी बाई असं ठेवण्यात आले. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला व दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन केले. त्या वेळीच स्वाभिमानी लक्ष्मीबाईंनी ‘मेरी झांसी नही दूँगी’ अशी गर्जना करून 1857 च्या संग्रामात उडी घेतली. यामध्ये रणांगणावर त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Quotes शेअर करत त्यांच्या स्मृतीला नमन करा.





इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. 3 एप्रिल 1858 ला सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. या लढाईत 24 मे रोजी काल्पी इंग्रजांनी ताब्यात घेतली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले.
16 जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. या लढाईत स्वतः रणभूमीवर उतरलेल्या राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. ब्रिटिशांची दोन हात करताना त्या घायाळ झाल्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

