Ramzan Eid Special Recipes: रमजान ईद निमित्त घरी बनवा शीर कुर्मा, बिर्याणी सारख्या आणखी काही लज्जतदार रेसिपीज, Watch Video

या पदार्थांसोबत काही हटके आणि लज्जतदार रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर खाली दिलेले व्हिडिओ नक्की पाहा.

Ramzan Eid Recipes (Photo Credits: Youtube)

रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद. म्हणजेच तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा किंबहुना तो वाढवणारा सण म्हणजे रमजान ईद (Ramzan Eid). या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर मुस्लमि बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. तसेच आप्तलगांसोबत हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. यंदा लॉकडाऊन मुळे मुस्लिम लोकांना जरी एकमेकांच्या घरी जाता आले नाही तरी घरच्या घरी अगदी साग्रसंगीत तुम्ही हा सण साजरी करु शकता. या दिवशी घरी खास पक्वानांचे बेत बनतात.

यात शीर कुर्मा, बिर्याणी यांसारखे अनेक पदार्थ बनतात. या पदार्थांसोबत काही हटके आणि लज्जतदार रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर खाली दिलेले व्हिडिओ नक्की पाहा.

शीर कुर्मा

हेदेखील वाचा- Eid 2020 Special Mehendi: रमजान ईदच्या निमित्ताने काढलेली मेहंदी अधिक गडद करण्यासाठी 'हे' 7 नैसर्गिक उपाय एकदम सुरक्षित!

व्हेज गोल्ड कॉईन

गुळाचे गुलगुले

हेदेखील वाचा- Happy Ramadan Eid 2020 Messages: रमजान ईद मुबारक Wishes, Greetings, SMS, Images, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status वर शुभेच्छा देत द्विगुणित करा 'या' सणाचा आनंद!

चिकन बिर्याणी

मटन यखनी पुलाव

या दिवशी लहान मुलं आपल्या पेक्षा मोठयांकडे ‘ईदी’ मागतात. मोठी मंडळी देखील वस्तु, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ‘ईदी’ देत लहानग्यांना खुश करतात. गरीबांची मुलं देखील श्रीमंतांकडे ईदी मागतात या ईदीला भिक समजले जात नाही तर तो लहानांचा हक्क समजला जातो आणि त्यांना या दिवशी नाराज केले जात नाही.