Ram Navami Pooja Vidhi: भगवान राम जन्मोत्सवाची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

दरम्यान, राम ललाचा जमोत्सव विधी कशी करायची याबद्दलची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत, खाली दिलेली विधी पाहून तुम्ही रामनवमी साजरी करू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ram Navami 2023

Ram Navami Pooja Vidhi: प्रभू राम समस्त हिंदू समाजाचे आराध्य दैवत आहे. दरम्यान, देशभरात रामनवमीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. दरम्यान, आता अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माणचे कार्य जोरात सुरु आहे. त्यामुळे यंदाची रामनवमी अधिक खास आहे. रामनवमीचा सण फक्त आपल्या देशातच नव्हे तर परदेशी असलेल्या भारतीय वंशाच्या लोक  मोठ्या श्रद्धा साजरा करतात.हिंदू नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा झाल्यानंतर नवव्या दिवशी राम नवमी साजरी करण्याची प्रथा आहे. चैत्र महिन्यातील नवमी ही राम नवमी अर्थात श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा रामनवमी 30 मार्च रोजी आहे. दरम्यान, राम ललाचा जमोत्सव विधी कशी करायची याबद्दलची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत, खाली दिलेली विधी पाहून तुम्ही रामनवमी साजरी करू शकता.

राम नवमी 2023 जयंतीचा  शुभ मुहूर्त

श्री राम जन्मोत्सवाचा शुभ मुहूर्त सकाळी 11.11 ते दुपारी 01.40 पर्यंत आहे.

राम नवमी 2023 पूजा विधी 

 श्रीरामाचा जन्म दुपारी 12 च्या सुमारास साजरा केला जातो.

पाळणा गाऊन राम लल्लाला पाळण्यात झोपवून त्याचा जन्म सोहळा दरवर्षी साजरा करण्याची पद्धत आहे.

राम नवमी दिवशी रामायण सादर करण्याची रीत आहे. यानिमित्त रामायणातील काही प्रसंग लहान नाटुकल्यांच्या रूपात सादर केल्या जातात.

रामनवमी उत्सवाची सुरुवात जल (पाणी) अर्पण करून आणि भगवान सूर्याकडून पहाटे आशीर्वाद घेण्याने होते. लोक मानतात की भगवान सूर्याचे वंशज हे रामाचे पूर्वज होते.

रामभक्त दिवसभर उपवास करतात. राम जन्म साजरा करताना खीरीचा गोड नैवेद्य बनवण्याची देखील पद्धत आहे.