Raksha Bandhan Rangoli Designs: रक्षाबंधन सणाच्या निमित्त सहज-सोप्या रांगोळी डिझाईन काढून द्विगुणित करा राखी पौर्णिमा सणाचा आनंद!

दारामध्येही रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आकर्षक रांगोळी काढून या राखी पौर्णिमेचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता.

Raksha Bandhan Rangoli| Photo Credits: Instagram

भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी ला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही मंगप्रसंगी दारात रांगोळी काढली जाते. मग आज रक्षाबंधन सण देखील त्याला कसा अपवाद असेल? रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला जपणारा विशेष दिवस आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बहीण भावाला ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याच्याकडून रक्षण करण्याचं वचन घेते. मग यंदा तुमच्या घरी देखील भावाला ओवाळणीसाठी पाटावर बसवण्याआधी पाटाभोवती आकर्षक रांगोळी काढा. दारामध्येही रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आकर्षक रांगोळी काढून या राखी पौर्णिमेचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता. रांगोळी सफाईदार पद्धतीने काढण्याची तुम्हांला सवय नसेल तर काही साध्या-सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही या सणाच्या निमित्ताने आकर्षक रांगोळी काढू शकता. त्यासाठी युट्युबवर तुम्हांला सहज-सोप्या पण आकर्षक रांगोळ्यांचे अनेक पर्याय मिळतील. Raksha Bandhan 2020 Wishes: रक्षाबंधनानिमित्त WhatsApp Messages, ,Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून बहिण-भावाला द्या शुभेच्छा!

रक्षाबंधन हा सण श्रावणी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. कोळी बांधवांमध्ये या सणाचं एक विशेष आकर्षण असतं. महाराष्ट्रात कोळी समाज आजचा श्रावणी पौर्णिमेचा सण नारळी पौर्णिमा म्हणून देखील साजरा करतात.

राखी पौर्णिमा विशेष रांगोळी

राखी विशेष

 

View this post on Instagram

 

Rakshabandhan Rangoli 12 . Check out the video on YouTube link in the bio data If you recreate the design do tag us or dm . #leafrangoli #myrangoli #mysignaturestyle #rangolilovers #rangoli #rangolivideo #artknackbyaditi #rakhicelebration #rakhigifts #rakshabandhanrangoli #rakhirangoli #yellow #rangolitime #rangoliideas #innovativerangoli #creative #newideas #newdesign #trendingrangoli #brosis #bonding #rangolidesignfordiwali #diya #decorationideas #floorart #indianrangoli #culture

A post shared by Art knack by Aditi (@art_knack_by_aditi_) on

शुभ रक्षाबंधन

 

View this post on Instagram

 

Super quick Rakshabandhan Rangoli/रक्षाबंधन रांगोळी #rakshabandhanrangoli, #easyrakshabandhanrangoli, #simplerakshabandhanrangoli,

A post shared by The Rangoli House (@therangolihouse) on

बहीण-भावाचं नातं

 

View this post on Instagram

 

Happy raksha bandhan😍 Follow - @_sneh_art_ 🌸 रक्षाबंधन/राखीपौर्णिमा विशेष रांगोळी-7 🌸 . Decore Ur Lovely Home Wid This Beautiful Design ✨ . #_sneh_art_ #artist #artistsoninstagram #art #artwork #rangolidesigns #rangoli🎆 #rangoliart #rangolicompetition #rangoliartist #rangoliartist #rangolibyme #rangoli #rangolitime #rangolilove #rangolis #rangoli😍 #rakhipornima #happyrakhi #rakshabandhan #rakshabandhanrangoli #rakhispecial #artbysnehalchavan

A post shared by Designer dresse💃 (@designer__dresse01) on

पाटाभोवतीच्या रांगोळ्या

यंदा रक्षाबंधन सणावर देखील कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यामुळे अनेक बहिण-भावांनी यंदाचा रक्षाबंधनचा सण व्हर्च्युअल जगात साजरा करण्याचं ठरवलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अनेकांनी लांबचा प्रवास करणं टाळलं आहे.